अमरावती : जिल्हा परिषद शिक्षण विभागा अंतर्गत मराठी व उर्दू माध्यमाच्या नववी ते दहावी आणि अकरावी ते बारावीच्या वर्गांना शिकविण्यासाठी कंत्राटी पदवीधर अंशकालीन उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी याबाबतचे प्रशासकीय सोपस्कार १७ डिसेंबर रोजी पूर्ण केले.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त पदांवर कंत्राटी पदवीधर अंशकालीन उमेदवारांची मानधन व घडाळी तासिकेवर निवड केली आहे. यामध्ये नववी ते दहावीच्या मराठी माध्यमाकरिता सात आणि उर्दू व हिंदी माध्यमाकरिता प्रत्येकी एक तसेच अकरावी ते बारावीच्या मराठी माध्यमाकरिता पाच आणि उर्दू व मराठी माध्यमाकरिता प्रत्येकी एक अशा १९ जणांना नियुक्ती देण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ई.झेड.खान यांनी दिली.