अध्यादेश : कृषी प्रक्रिया, पणन्, विधी, अर्थशास्त्र, वाणिज्य तज्ज्ञअमरावती : राज्यात ५ कोटी किंवा त्यापेक्षा अधिकचा आर्थिक व्यवहार असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर ४ तर ५ कोटी पेक्षा कमी वार्षिक उलाढाल असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर दोन तज्ज्ञ व्यक्तींची विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. शासनाने याविषयी १६ जून रोजी अध्यादेश काढला होता. त्याची अंमलबजावणी होणार आहे. राज्य घटनेच्या कलम २१३ (२) अन्वये अध्यादेश काढल्यानंतर होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून हा अध्यादेश सहा महिन्यापर्यंत वैध असतो. या अनुषंगाने विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन १३ जुलै रोजी सुरू झाले होते. तेव्हापासून सहा आठवडे म्हणजेच ४२ दिवसांपर्यंत हा अध्यादेश लागू असतो. तत्पूर्वी या अध्यादेशातील तरतुदीप्रमाणे तज्ज्ञ संचालकांची निवड करावी लागणार आहे. कृषी प्रक्रियेमध्ये नेमल्या जाणाऱ्या तज्ज्ञांचा कृषी प्रक्रियेचा व्यवसाय असावा, अशी अट आहे. त्याचे स्वत:च्या नावे नोंदणी प्रमाणपत्र किंवा कृषी सहकारी प्रक्रिया संस्थेचा संचालक असावा व संस्था गेली ३ वर्ष सातत्याने उत्पादनाखाली असावी, अशीही अट आहे. तसेच कृषी प्रक्रिया उद्योगासाठी पुरस्कारप्राप्त व्यक्तीस प्राधान्य देण्यात आले आहे. या तज्ज्ञांच्या नेमणुकीमुळे बाजार समितीचा कारभार अधिक पारदर्शक होण्यास मदत होणार असून अनेक बदल घडून येतील.
बाजार समित्यांवर होणार तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती
By admin | Published: November 10, 2015 12:25 AM