भातकुली : महाडीबीटी प्रणालीवरील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांनी वर्ष २०२०/२१ या शैक्षणिक वर्षात प्रवेशित व नूतनीकरणाचे अर्ज विद्यार्थ्यांकडून परिपूर्ण भरून घेऊन पोर्टलला सादर करावे. विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती व मार्गदर्शन करावे, असे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्त मंगला मून यांनी केले आहे.
सामाजिक न्याय विभागाद्वारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी विभागाद्वारे महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी अनुक्रमे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा, परीक्षा फी, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना राबविण्यात येतो. महाडीबीटी संकेत स्थळावर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावे, असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त मंगला मून यांनी केले आहे.
------------