पालकमंत्र्यांनी केली पाहणी : लोटस, कॅक्टस गार्डनही होणारअमरावती : पर्यटकांसाठी अमरावती वडाळी वन उद्यानात लवकरच भव्य आधुनिक मत्स्यालय साकारणार असून यासाठी जागेची पाहणी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी नुकतीच केली. यावेळी जिल्हा मत्स्य अधिकारी दीक्षित व उपवनसंरक्षक निनू सोमराज उपस्थित होत्या. पालकंमत्र्यांनी बांबू गार्डनचीसुद्धा यावेळी पाहणी केली. नागपूरच्या धर्तीवर अमरावतीत मत्स्यालय साकरले जाणार असून यामध्ये विविध प्रजातीच्या शोभिवंत मासे असणार आहेत. मत्स्यालय मत्स्य विद्यापीठ नागपूरच्या देखरेखीखाली तयार होणार आहे. मत्यालयामुळे पर्यंटकांना आकर्षित करता येणार असून अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. मत्स्यालयाचा संपूर्ण आराखडा व निधीचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. निधीबाबत कुठलीच अडचण उदभवणार नाही, अशी ग्वाहीसुध्दा यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.बांबू गार्डनचे काम अंतिम टप्प्यातवन विभगाच्या वडाळीतील बांबू गार्डनचे काम अंतिम टप्प्यात आले असून ते लवकरच पर्यटकांसाठी खुले होणार आहे.पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या महत्त्वाकांक्षी कामांपैकी हे एक काम असून विविध प्रजातींचे देश विदेशातील बांबू येथे पर्यटकांना पहायला मिळणार आहेत. वडाळी उद्यानात पालकमंत्र्यांनी बुधवारी पाहणी केली असून कमळ तलावाचेही निरीक्षण केले. लोटस पॉडमध्ये विविध प्रजातींचे कमळ येथे असणार आहेत. उद्यानाच्या फुटका तलावाच्या पाझरातून लोटस पाँडमध्ये पाणी आणले जाणार आहे. बांबू गार्डन, कॅक्टस गार्डन, लोटस पॉड व मत्स्यालयामुळे वडाळी वन उद्यानाचे रुपडे पालटणार आहे. (प्रतिनिधी)
वडाळी वनोद्यानात साकारणार मत्स्यालय
By admin | Published: June 17, 2016 12:13 AM