लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : आनंदवनातील ग्रीन हाऊस बैलबंडा परिसरात जनावरांकरिता चाºयाची लागवड केली जाते. या चाºयाला गुरूवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास आग लागली. यात नऊ एकरातील जनावरांचा चारा जळून खाक झाला.घटनेनंतर आनंदवनातील कार्यकर्त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अखेरीस वरोरा पालिकेच्या अग्निशामक दलाला घटनास्थळावर पाचारण करण्यात आले. आनंदवनात मोठ्या प्रमाणात पाळीव जनावरे आहेत. या जनावरांकरिता चाºयाची लागवड आनंदवनातील ग्रीन हॉऊस बैलबंडा परिसरातील नऊ एकरात केली जाते. या जागेवर प्रत्येकी तीन महिन्यात चाºयाची लागवड केली जाते.सध्या लागवड केलेला चारा वाळव्याच्या स्थितीत असताना चाºयाला आग लागली. घटनास्थळानजीक वीज कंपनीचे ट्रान्सफार्मर आहे तसेच नजीकच आनंदवनाची वसाहत आहे. त्यामुळे आग विझविण्याकरिता आनंदवनातील कार्यकर्ते शर्थीचे प्रयत्न करीत होते. आग आटोक्यात आणण्याकरिता वरोरा पालिकेचे अग्निशमक दल पोहचले व आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र जनावरांचा चारा जळाल्याने भविष्यात चाºयाची टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे.
आनंदवन परिसरातील नऊ एकरातील जनावरांचा चारा जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:43 PM