चिखलदरा/अकोट : पुनर्वसित गावांमध्ये सरकारकडून उपेक्षा झाल्यानंतर पुन्हा मेळघाटातील मूळ गावांमध्ये परतण्याच्या तयारीत असलेले आदिवासी व सुरक्षा दलांमध्ये मंगळवारी दुपारी २ वाजता मेळघाटातील केलपानी, गुल्लरघाट परिसरात सशस्त्र संघर्ष झाला. यामध्ये राज्य पोलीस व राज्य राखीव पोलीस दलाचे (एसआरपीएफ) १५ जवान, वन विभागाचे ५० कर्मचारी आणि १० ते १५ आदिवासी जखमी झाल्याची माहिती आहे. सदर परिसर हा दुर्गम असल्याने नेमके चित्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मागील आठ ते दहा दिवसांपासून व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात प्रवेश घेण्याच्या तयारीत जवळपास दोनशे आदिवासी गुल्लरघाट जंगलात, केलपाणी परिसरात उघड्यावर ठाण मांडून बसले आहेत.व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात येत असलेल्या अमोणा, बारुखेडा, धारगड, सोमठाणा बुद्रुक, सोमठाणा खुर्द, गुल्लरघाट, केलपाणी, नागरतास गावांचे पुनर्वसन आदिवासी ग्रामस्थांना मान्य नाही. बँक खात्यावर पैसे आणि जमिनींचे सातबारे द्या, अशी त्यांची मागणी आहे. १५ जानेवारी रोजी काही गावकरी मेळघाटमधील आपल्या मूळ गावी परतले. मंगळवारी दुपारी पोलिस, एसआरपीएफ व वनविभागाचे १०० पेक्षा अधिक कर्मचारी आदिवासींची समजूत काढण्यासाठी आले असता, त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. ग्रामस्थांनी दगड, तिर कमठा, गोफण, काठ्या व मिरची पावडरने सुरक्षा दलाच्या जवांनावर हल्ला केला. सुमारे ३०० ग्रामस्थांनी अचानक चढविलेल्या हल्ल्यामुळे गांगारुन गेलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांनीही त्यांच्यावर प्रतिहल्ला केला. या सशस्त्र संघर्षात वनविभागाचे ५० जवान जखमी झाले, तर १५ पोलिस कर्मचारी जखमी झाले. १५ वाहनांची तोडफोड करण्यात आली. जखमी जवानांना अकोट येथील ग्रामीण रुग्णालयासह अकोला व अमरावतीस हलविण्यात आले आहे. धारगडचे आरएफओ सुनिल वाकोड हे गंभीर जखमी झाले आहेत. वनपाल इंगोले यांच्यावर कुºहाडीने हल्ला झाल्याने त्यांच्या पाठीवर खोल घाव झाला आहे. अनेक कर्मचाºयांच्या मानेवर, पाढीवर, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अनेकांची डोकी फुटल्याची माहिती आहे. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. परिसरात कलम १४४ लागू करण्यात आली आहे.जखमी झालेल्या कर्मचा-यांची नावेरामेश्वर आडे, अविनाश गजबे, विवेक येवतकर, संजीव इंगोले या वनपालांच्या पाठीवर कुºहाडीने वार करण्यात आले. त्यांना अकोला येथे हलविण्यात आले. याशिवाय नितीन राऊत, श्याम देशमुख, श्रीकृष्ण पारस्कर, आर. एच. सावलकर, सुनील वाकोडे (आरएफओ) हे वन कर्मचारी, अधिकारी जखमी आहेत. तर एसआरपीएफचे पोलीस निरीक्षक राजू वाघमारे, पोलीस कर्मचारी शंकर डाखोडे, हेमंत मोहन सरकटे, संदीप वाकोडे, कैलास वाकोडे, आनंद पवित्रकार, शेखर तायडे यांचा जखमींमध्ये समावेश आहे. याशिवाय वनपाल पवन बावनेर, वन विभागाचे एस. डी. जामकार, एस. जी. माने, एस. एस. सावंत, दिनेश केंद्रे, एम. आर. राठोड, हिंमत खाडवाये यांचा जखमीत समावेश असल्याची माहिती वन विभागाने दिली.परिस्थिती तणावपूर्णआदिवासी, पोलीस व वन सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या या सशस्त्र संघर्षानंतर केलपाणी, गुल्लरघाट परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. अमरावती येथील पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळावर दाखल झाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी, मेळघाटचे वनपरिक्षेत्रअधिकारी विशाल माळी हे घटनास्थळावर ठाण मांडून आहेत.>समजून घेण्यात कमी पडलोआदिवासींचे म्हणणे समजून घेण्यात आम्ही कमी पडलो की, काही राजकीय मंडळींनी आदिवासींना चिथावणी दिल्यामुळे हा प्रकार घडला, याची चौकशी करण्याचे आदेश अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक व वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांना दिले आहेत.- सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री>जंगलाला आग लावली : वन व पोलीस कर्मचाºयांवर हल्ला केल्यानंतर पुनर्वसित ग्रामस्थांनी जंगलाला आग लावली. हा परिसर व्याघ्र प्रकल्पात मोडत असून मोठी वनसंपदा नष्ट झाली आहे.>परिसराला छावणीचे स्वरूप : गेल्या आठ दिवसांपासून २०० पोलीस, २०० वन कर्मचारी व ११२ एसआरपीएफचे जवान केलपाणी परिसरात आहेत. त्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.
आदिवासी-वन कर्मचाऱ्यांमध्ये पुनर्वसनावरून सशस्त्र हल्ले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 6:43 AM