लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्रीय निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार देशभरात आदर्श आचारसंहितेचे पालन होण्यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणांना निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत. याच धर्तीवर पोलीस आयुक्तालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गाला जोडणाऱ्या शहराच्या सीमावर्ती भागात बुधवार, १३ मार्चपासून सशस्त्र पोलीस चेक पोस्ट आणि नाकाबंदी सुरू केली आहे. यामाध्यमातून वाहनांची कसून तपासणी होत आहे.पोलीस आयुक्त संजयकुमार बावीस्कर यांच्या आदेशाने १० पोलीस ठाण्यांच्या सीमावर्ती भागात सशस्त्र पोलीस चेकपोस्ट, नाकाबंदी सुरू केली आहे. रात्रीच्या वेळी शहरात ये-जा करणाºया वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार पोलीस विभागाने सीमावर्ती भागात सशस्त्र पोलीस चेकपोस्ट, नाकाबंदी स्थळे निश्चित केली आहे. सीमावर्ती भागात कापडी तंबू उभारण्यात आले असून, येथे पोलीस चेकपोस्ट व नाकाबंदी करून कर्तव्य बजावत आहेत. निवडणूक काळात ब्लॅक मनी, अवैध दारूसाठा, शस्त्रे, विनापरवानगीची वाहने आदी बाबी सर्रासपणे होत असल्याने पोलीस आयुक्तालयाने सीमावर्ती भागात उभारलेले सशास्त्र पोलीस चेकपोस्ट, नाकाबंदी मैलाचा दगड ठरणार आहे.या मार्गावर आहेत चेकपोस्टयवतमाळ, अकोला टी पॉइंट, रहाटगाव, मोर्शी- वरूड, नांदगाव पेठ, भातकुली मार्ग, वलगाव मार्ग, परतवाडा- दर्यापूर मार्ग टी पॉइंट, चांदूर रेल्वे- पोहरा मार्ग, मालखेड मार्ग, कुºहा मार्ग, कठोरा नाका आदी मार्गावर सशस्त्र पोलीस चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. तसेस १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महत्त्वाच्या स्थळी नाकाबंदी पॉइंट निर्माण करण्यात आले आहे. चेकपोस्ट आणि नाकाबंदी स्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी भेटी देऊन आढावा घेतील, असे निर्देश पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी दिले आहेत.निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सीमावर्ती भागात चेकपोस्ट, नाकाबंदी स्थळे उभारली आहेत. यात वाहनांची तपासणी लक्ष्य आहे. गैरप्रकाराला आळा बसविला जाईल. अन्य जिल्ह्यांतून येणाºया वाहनांची कसून तपासणीचे निर्देश दिले आहे.- संजयकुमार बाविस्कर,पोलीस आयुक्त, अमरावती
सीमेवर सशस्त्र पोलीस चेकपोस्ट, नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 10:21 PM
केंद्रीय निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार देशभरात आदर्श आचारसंहितेचे पालन होण्यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणांना निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत.
ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : राष्ट्रीय, राज्य महामार्गाला जोडणाऱ्या शहराच्या सीमेवर वाहनांची तपासणी