लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : आचारसंहितेच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने तालुक्यातील ुनागठाणा आणि पुसला येथे सशस्त्र चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. या चौक्यांच्या माध्यमातून सीमेवरून ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. रात्रंदिवस कडक पहारा देऊन नाकाबंदी, वाहनांची नोंदणी, तपासणी तसेच सीमावर्ती भागातून येणाऱ्या वाहनांची तसेच संशयास्पद व्यक्तींची तपासणी केल्या जात आहे.राज्य महामार्गावरील शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन्ही चौक्या असल्याने ठाणेदार श्रीराम गेडाम यांनीसुद्धा अधिनिस्थ यंत्रणेस दिशानिर्देश दिले आहेत. मध्य प्रदेशातून मुलताई आणि पांढुर्णा मार्गे येणाºया वाहनाची कसून तपासणी केल्या जात आहे.निवडणूक काळात अवैध रक्कम, आक्षेपार्ह वस्तू, दारूगोळा, शस्त्रे, विनापरवाना वाहने तसेच अवैध दारूची तस्करी यावर पोलिसांची करडी नजर आहे. नागठाणा येथील चौकीवर सहायक पोलीस उपनिरिक्षक सुनील बनारसे, पोलीस कॉन्स्टेबल भूषण ब्राम्हणे, दिलीप राऊत कार्यरत आहेत. ठाणेदार श्रीराम गेडाम, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल बायस्कर, आशिष मेटनकर यांनी गस्तीदरम्यान वाहनांची तपासणी तसेच कागदपत्रांची माहिती जाणून घेतली.चौकी असुरक्षितनागठाणा आणि पुसला-उराड रस्त्यावर तंबू लावून नाकाबंदी चौकी उभारण्यात आली. त्यात वायरलेस यंत्रणा लावण्यात आली. तथापि, या चौकींवर विजेची व्यवस्था नसून, झुडुपे असलेल्या अडगळीच्या जागेवर शेताच्या धुऱ्यालगत त्या तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आल्या. त्यामुळे रात्रीच्या वेळी सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका होण्याची भीती पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवर सशस्त्र पोलीस चेकपोस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:03 PM
आचारसंहितेच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने तालुक्यातील ुनागठाणा आणि पुसला येथे सशस्त्र चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. या चौक्यांच्या माध्यमातून सीमेवरून ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
ठळक मुद्देवाहनांची तपासणी : रात्रीची गस्त, पोलिसांचा खडा पहारा