मोर्शी : तालुक्यातील तळणी फाटा येथे १४ जुलै रोजी किराणा एजन्सीचा मालवाहू ट्रक अडवून चालक-वाहकाला मारहाण करून साडेतीन लाखांची रक्कम लुटणाऱ्या सहा दरोडेखोरांना स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासांत जेरबंद केले.
स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके व मोर्शी पोलीस ठाण्याच्या पथकांनी गुन्ह्याचा समांतर तपास केला. यादरम्यान राजा ऊर्फ नावेद (रा. गुलिस्तानगर) हा पैसे उधळत असल्याची टीप मिळाली होती. त्याच्यासह दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३,६०,७२५ रुपयांच्या वाटमारीचा खुलासा झाला. तो व त्याचा साथीदार पुण्याला जात होते. त्याने इतरांची माहिती देताच त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ६,०५,५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व पुढील कारवाईकरीता मोर्शी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे व मोर्शीचे ठाणेदार सोळंके यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सूरज सुसतकर, आशिष चौधरी, तस्लीम शेख, सहायक उपनिरीक्षक मुलचंद मूलचंद भांबूरकर, संतोष मुंदाने, जमादार दीपक उईके, नापोका सचिन मिश्रा, शकील चव्हाण, दीपक सोनाळेकर, युवराज मानमोठे, अमित वानखडे, चेतन दुबे, स्वप्निल तंवर, नीलेश डांगोरे, रवींद्र बावणे, पुरुषोत्तम यादव, संतोष तेलंग, मंगेश लकडे, बळवंत दाभणे, अक्षय हरणे, सागर धापड, चालक तेलगोटे, मानकर, शिरसाठ, मोर्शीचे उपनिरीक्षक सचिन भांडे, सहायक उपनिरीक्षक राजू मडावी, संदीप वानखडे, विष्णू पवार यांनी ही कारवाई केली.
------------