मिर्गी सप्ताह : हजार नागरिकांमध्ये चार रुग्णलोकमत विशेषसंदीप मानकर अमरावतीमिर्गी हे मेंदूमध्ये अचानकपणे निर्माण होणारे अनियंत्रित बदल आहे. या आजाराचे संपूर्ण भारतात एक कोटी रुग्ण आढळतात. महाराष्ट्रात एक हजार नागरिकांमध्ये ४ रुग्ण ‘मिर्गी’ या आजाराने ग्रस्त असल्याचे एका संशोधनात स्पष्ट झाल्याचे मिर्गीतज्ज्ञ डॉ. सिकंदर अडवाणी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सोमवारपासून जागतिक मिर्गी सप्ताहाला सुरूवात झाली आहे. ‘मिर्गी’ या आजारावर एक संशोधन झाले. त्यानुसार देशात एक हजार नागरिकांमध्ये ५ ते ६ नागरिक या आजाराने ग्रस्त आहेत, तर महाराष्ट्रात हजार लोकांमागे ४ रुग्ण आढळत असल्याचे निदर्शनास आले आहे.हा आजार अनेक रुग्णांमध्ये येऊ शकतो. याची लक्षणे- रुग्ण अचानक बेशुद्ध होतो. तसेच तो एकसारखा पाहतो. तोंडात अचानक फेस येते, अचानक लघवी होणे ही आहेत. या आजारांचे इतरही कारणे असू शकतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचे दारू व नशायुक्त औषधांचे अधिक सेवन करणे, हे असू शकते. मिर्गी आजाराने ग्रस्त रुग्णांना असा दौरा पडला तर त्याला एका कडेवार झोपवून ठेवा व त्याला चप्पलाची सुंगणी देण्याच्या भानडगडीत पडू नका. रुग्णांना त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांकडे नेल्यास तो बरा होऊ शकतो. या आजारावर योग्य शस्त्रक्रियेच्या माध्यमातूनही उपचार करणे शक्य आहे.
मिर्गीचे देशभरात एक कोटी रुग्ण
By admin | Published: November 21, 2015 12:11 AM