अमरावती : ‘आयपीएल २०२३’ मधील क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या एका सट्टेबाजाला पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने अटक केली. त्याच्याकडून ५५ हजारांचा मोबाइल जप्त करण्यात आला. ही कारवाई ११ एप्रिल रोजी रात्री ९.४० वाजता साईनगर परिसरातील यशवंत लॉनसमोर करण्यात आली. हर्षद दिलीपकुमार जयस्वाल (२९, रा. गौरी अपार्टमेंट, अकोली मार्ग, अमरावती) असे अटक सट्टेबाजाचे नाव आहे.
स्थानिक साईनगरातील यशवंत लॉनसमोर हर्षद जयस्वाल हा मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल या संघात सुरू असलेल्या सामन्यावर मोबाइलद्वारे लोकांना लिंक देऊन खायवाडी व लागवाडी करीत होता. याबाबत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या विशेष पथकाला माहिती मिळाली. त्या आधारे धाड टाकली असता हर्षद हा मोबाइलमधील गुगल क्रोममध्ये भोले एक्सएच नामक बेकायदेशीर सॉफ्टवेअरद्वारे क्रिकेट सामन्यावर बेटिंग करताना आढळून आला. चौकशीत त्याने ते ॲप योगेश साहू (रा. छांगाणीनगर) याच्याकडून घेतले असून दोघांची त्या व्यवहारात भागीदारी असल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने योगेश साहूचा शोध घेतला. परंतु, त्याचा पत्ता लागला नाही. पोलिसांनी हर्षदकडून ५५ हजार रुपयांचा मोबाइल जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाफ्रेजरपुरा पोलीस जाणार दिल्लीलासीपींचे विशेष पथक व राजापेठ पोलिसांनी ५ ते ११ एप्रिल या सहा दिवसांत क्रिेकेट सट्टयाबाबत पाच कारवाया केल्या. तर, आठ सट्टेबाजांना अटक केली. तर आरोपींच्या कबुलीतून बाहेर पडलेेले चार पाच जण पोलिसांच्या अटकेबाहेर आहेत. फ्रेजरपुरा पोलिसांच्या पीसीआरमध्ये असलेल्या तीन आरोपींनी ‘एसएम’ नामक बडया बुकीचे नाव घेतले. त्याचे लोकेशन ट्रेस केले असता ते मुंबईत आढळले. मात्र त्यानंतर एसएमचा मोबाईल बंद झाला. आता तो दिल्लीला पळाल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. त्यामुळे फ्रेजरपुरा पोलिसांचे एक पथक पुढील आठवड्यात दिल्लीला जाणार आहे.म्होरके होणार का गजाआड?तीन चार वर्षांपासून शहर हद्दीत अनेक क्रिकेट सट्टेबाज पकडण्यात आले. मात्र त्यांच्या ‘आकांं’पर्यंत कुणी पोहोचले नाही. गतवर्षी देखील राजापेठ पोलीस नागपूरला जाऊन रिक्तहस्ते परतले होते. अशा प्रकरणांमध्ये अनेकदा मुंबई, नागपूर, झारखंड, गोव्यातील बड्या बुकींची नावे समोर येतात. मात्र, घटनास्थळी सापडलेल्या आरोपींवरच समाधान मानले जाते. मात्र, सीपी नविनचंद्र रेडडी यांनी ‘बड्या माशांवर’ देखील लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे राजापेठ हद्दीतील दोन ते तीन जगजाहिर बडे बुकी अटकेत येतील का, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.