वैभव बाबरेकर ।आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यातील समृद्ध जंगलात विविध वन्यप्राणी वास्तव्य करीत असताना जलाशयांवर स्थंलातरित पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. आफ्रिका येथून स्थंलातरित झालेल्या ओपन बिल्स पक्ष्यांचे थवे जलाशयावर मुक्त विहार करता निसर्ग भ्रमंतीदरम्यान वन्यप्रेमींच्या दृष्टीस पडले. जिल्ह्यातील जंगल जैवविविधतेने नटलेल्या पोहरा-मालखेड जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्याची मागणी आता वन्यप्रेंमींमध्ये जोर धरू लागली आहे.जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्थेतर्फे हॉलीडे विथ नेचर उपक्रम राबविण्यात येत असून सुटीच्या दिवशी संस्थेच्या पदाधिकाºयांसह वन्यप्रेंमी जंगल संवर्धनाविषयी कार्य करतात. निसर्ग भ्रमंतीदरम्यान जंगलातील विविध समस्यांवर मंथन करून समस्या सोडण्याविण्याचा प्रयत्नदेखील ते करतात. याशिवाय जंगलाशेजारी राहणाºया गावकºयांमध्ये जंगल संवर्धनाविषयी जनजागृती करतात. जंगलाला प्लास्टिक प्रदूषणमुक्त करण्याचे प्रयत्न सातत्याने सरू आहे. रविवारी संस्थेच्या मोनाली निंभोरकर, सागर मैदानकर, अंकुश शेंडे, मंगेश कावरे, ऋषिकेश वानखडे, बाहुबली फुलाडी, रचना फुलाडी, आशिष दहिवाडेकर, योगेश दंडाळे, प्राजक्ता कोंडे, शैलेश धिरडे, मयुरेश डोंगरे यांनी पोहरा जंगलात 'हॉलीडे विथ नेचर'च्या अनुषंगाने जंगल भ्रमंती केली. दरम्यान, त्यांना म्यानमार तसेच साऊथ आफ्रिका येथून स्थंलातरण करून जलाशयावर आलेल्या ओपन बिल्स टार्क पक्ष्यांचे थवे दिसले. या पक्षांची नोंद त्यांनी घेतली असून तब्बल ८० पक्षी जलाशयावर विहारताना दिसून आल्याचे निदर्शनास आले आहे. पोहरा जंगल समृध्द व जैवविविधतेने भरपूर असल्यामुळे या जंगलास अभयारण्याचा दर्जा प्राप्त व्हावा, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून वन्यप्रेमी करीत आहे. आता जंगल भ्रमंतीत आलेल्या अनुभवावरून पुन्हा या मागणीचा जोर वाढू लागला आहे.मादी बिबटाचा पिल्लासह मुक्त संचारपोहरा-चिरोडी जंगलात बिबटांची संख्या अधिक असून अनेकदा ते नागरिकांच्या दृष्टीस पडतात. रविवारी निसर्गभ्रमंतीदरम्यान काही तरुणांना पोहरा-चिरोडी जंगलात मादी बिबट पिल्लास मुक्त संचार करताना आढळून आली.
जलाशयावर ओपन बिल्स टार्क पक्ष्यांचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:03 PM
जिल्ह्यातील समृद्ध जंगलात विविध वन्यप्राणी वास्तव्य करीत असताना जलाशयांवर स्थंलातरित पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे.
ठळक मुद्देनिसर्ग भ्रमंती : अभयारण्याचा दर्जा देण्याची वन्यप्रेमींची मागणी