गतवर्षीपेक्षा यावर्षी धामणगाव रेल्वे तालुक्यात पाण्याची मुबलकता असल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकाकडे मोर्चा वळविला. त्यामुळे यंदा सिंचन क्षेत्र वाढले. परिणामी गावातील गुरांना मिळत होता. परंतु प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मेंढ्या बोलावून तो चारा त्यांना दिल्याने गावातील गुरांना चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे बाहेर गावातील कोणताही नागरिक एका गावातून दुसऱ्या गावात जाण्याची हिंमत करीत नाही. परंतु मेंढपाळांना परवानगी मिळते कशी, या प्रश्नाने मात्र नागरिकांच्या मनात घर केले आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यात उन्हाळी पीक म्हणून तीळ, मूग व भुईमूग अशा विविध पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली. त्यामुळे तालुक्यातील शेती हिरवीगार झाली. हिरवीगार शेतीतून परिसरातील गुरांना चारा मिळेल, अशी आशा होती. मात्र, प्रत्येक शेतकऱ्याने शेताची पोत वाढविण्यासाठी मेंढपाळांना परवानगी दिल्याने परिसरातील गोपालक चिंतेत सापडले आहे. त्यामुळे परिसरातील गुरेढोरे चाऱ्यासाठी भटकंती करत असल्याचे विदारक चित्र तालुक्यात दिसून येत आहे.