लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील एक कर्मचारी अश्लील चित्रफीत बघत असल्याप्रकरणी शुक्रवारी युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने शुक्रवारी विद्यापीठावर हल्लाबोल केला. कुलगुरुंवर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. दरम्यान कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना चाबूक भेट देण्याचा प्रयत्न झाला असता त्यांनी नाकारले. अखेर आंदोलकांच्या मागणीनुसार ‘त्या’ कर्मचाºयास सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील कर्मचारी कर्तव्यावर कार्यरत कर्मचारी चक्क अश्लील चित्रफित बघत असल्याबाबतचे पुरावे वजा तक्रार दोन दिवसांपूर्वी कुलगुरुंना अभाविपतर्फे देण्यात आले. मात्र, या कर्मचाºयावर कारवाई न करता त्याची पाठराखण केली जात असल्याचा आरोप युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने केला. अनूप अग्रवाल, नीलेश भेंडे, रौनक किटुकले, अभिजीत देशमुख, मंगेश कोकाटे, महेश भाराणी आदी युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाºयांनी कुलगुरुंशी दालनाबाहेर चर्चा केली. यावेळी कुलगुरुं, कुलसचिव अजय देशमुख, परीक्षा विभागाचे संचालक जयंत वडते आदींनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आंदोलक ‘त्या’ कर्मचाºयाचे निलंबन झालेच पाहिजे, या मागणीवर ठाम होते.अखेर ‘तो’ कर्मचारी सक्तीच्या रजेवरविद्यापीठाच्या परीक्षा विभागात चव्हाण नामक कार्यरत कर्मचारी बुधवारी २६ जुलै २०१७ रोजी संगणकावर अश्लिल चित्रफित बघत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. यासंबंधीचे वृत्त खासगी वाहिन्यांवर झळकले. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची प्रतिमा मलीन झाल्याचा आक्षेप युवा स्वाभीमान विद्यार्थी संघटनेच्यावतीने करण्यात आला. चव्हाण नामक कर्मचाºयांचे निलंबनाची मागणी करण्यात आली. अखेर शुक्रवारी आंदोलकांच्या मागणीनुसार चौकशी पूर्ण होईस्तोवर चव्हाण यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय झाला.
अश्लील चित्रफीतप्रकरणी विद्यापीठावर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 12:14 AM
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील एक कर्मचारी अश्लील चित्रफीत बघत असल्याप्रकरणी शुक्रवारी युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने शुक्रवारी विद्यापीठावर हल्लाबोल केला.
ठळक मुद्देविद्यार्थी स्वाभिमान आक्रमक : कुलगुरुंनी ‘चाबूक’ भेट घेण्याचे नाकारले