आशासेविकांना नियमित विविध सर्वे, माताबाल लसीकरण, याशिवाय कोविड काळात नागरिकांची वेळोवेळी आरोग्य तपासणी याचे वरिष्ठ आरोग्य कार्यालयात तात्काळ अहवाल सादरीकरण करणे यादरमान कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने अनेक आशा वर्कर आणि कुटुंबातील सदस्य कोरोना संक्रमित झाल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटात सापडलेल्या आहे . काहींच्या कुटुंबातील सदस्य मृत्युमुखी पडले पण शासनाने वेळोवेळी कामाची दखल म्हणून स्तुती केली . परंतू केवळ स्तुती केल्याने आर्थिक परिस्थिती सुधारत नाही असे विचार अंबाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील गतप्रवर्तक संध्या शर्मा,मेघा झरवडे तसेच सर्व आशासेविकानी व्यक्त केली . शासन युद्धपातळीवर काम करून घेत असले तरी यासाठी केवळ एक हजार रुपये मोबदला देत आहे . आर्थिक ,सामाजिक सुरक्षा नाही . कोरोना काळात अनेकदा आशा, गतप्रवर्तक यांना नागरिकांच्या रोष्याचा सामना करावा लागून मनस्ताप सहन करावा लागतो . यावेळी प्रशासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या मदतीला नसते .एवढे सर्व करून तुटपुंज्या मानधनात समाधान मानावे अशी शासनाची मानसिकता आहे.
बेदखल होत असल्याने आशा, गतप्रवर्तक यांनी 21 जूनपासून संप पुकारला आहे . मागण्यांचे निवेदन मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांना देण्यात आले आहे.