राज्यातील आशा वर्करना शासकीय कर्मचारी दर्जा, पेन्शन, मेडिकल योजना लागू करण्यात यावी, आशा वर्कर, गटप्रवर्तक महिला यांना २२ हजार रुपये मानधन देण्यात यावे, ग्रामपंचायतीच्या उपलब्ध निधीतून आशा वर्कर यांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मिळावा, कोविड लसीकरण केंद्रावर काम करण्याचे वेगळे मानधन मिळावे, त्याचबरोबर कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्यास ५० लक्ष रुपयाचा विमा मंजूर करण्यात आला आहे, परंतु यासंदर्भातील राज्यात कारवाई झाली नाही. यासंदर्भातील आदेश लवकर देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रतिभा मकेश्वर, रंजना लवणकर, संगीता लांडगे, मीना बरबुधे, वनमाला शेंडे, ललिता कंगाले, अंजली साबळे, चित्रा सोनटक्के, शीतल आमले, प्रीती भिलकर, अनिता गोंधले यांसह आशा वर्कर, गटप्रवर्तक महिला उपस्थित होत्या.
---------------------------------------