लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कृषिउत्पन्न बाजार समिती सभापतिपदी मंगळवारी अशोक पंजाबराव दहीकर यांची अविरोध निवड करण्यात आली. प्रफुल्ल राऊत यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते. विद्यमान संचालक मंडळाला अडिच वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच गटबाजीचे ग्रहण लागल्याने दहीकर हे तिसरे सभापती ठरले. बाजार समितीचे तेविसावे सभापतीचा मान त्यांना मिळाला आहे.अमरावती येथे बाजार समितीच्या सभागृहात मंगळवारी झालेल्या निवडणूक सभेला उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी हे जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेले प्राधिकृत अधिकारी होते. यावेळी अशोक दहीकर यांनी दोन अर्जांची उचल केली व त्यांचेच अर्ज दाखल झाल्याने प्राधिकृत अधिकाºयांनी त्यांची अविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी बाजार समितीचे सचिव दीपक विजयकर व निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. बैठकीला संचालक प्रकाश काळबांडे, किशोर चांगोले, सुनील वºहाडे, प्रवीण भुगूल, नाना नागमोते, प्रफुल्ल राऊत, उषा वनवे, किरण महल्ले, रंगराव बिचुकले, विकास इंगोले, श्याम देशमुख, प्रांजली भालेराव, मिलिंद तायडे, उमेश घुरडे, सतीश अटल, प्रमोद इंगोले, बंडू वानखडे उपस्थित होते.आठ इच्छुकगत दोन महिन्यांपासून बाजार समितीच्या राजकारणात रंगत वाढली. प्रफुल्ल राऊत यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याच्या अर्जावर स्वाक्षरीपासूनच सभापतिपदासाठी प्रकाश काळबांडे, सुनील वºहाडे, अशोक दहीकर, किरण महल्ले, विकास इंगोले, रंगराव बिचकुले, श्याम राऊत यांच्या नावाची चर्चा होत गेली.
अमरावती बाजार समितीच्या सभापतिपदी अशोक दहीकर अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 10:55 PM
कृषिउत्पन्न बाजार समिती सभापतिपदी मंगळवारी अशोक पंजाबराव दहीकर यांची अविरोध निवड करण्यात आली. प्रफुल्ल राऊत यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते. विद्यमान संचालक मंडळाला अडिच वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच गटबाजीचे ग्रहण लागल्याने दहीकर हे तिसरे सभापती ठरले. बाजार समितीचे तेविसावे सभापतीचा मान त्यांना मिळाला आहे.
ठळक मुद्देगटबाजीच्या राजकारणात अडीच वर्षांत तिसरे सभापती