शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

अस्मानी, सुल्तानी संकटाचे २८४७ बळी !

By admin | Published: June 19, 2016 12:08 AM

अस्मानी आणि सुल्तानी संकटाच्या माऱ्याने जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल २८४७ शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे. सततची नापिकी, उत्पादन खर्चात झालेली वाढ, ...

१६७२ प्रकरणे अपात्र : ११३७ कुटुंबांना मदतीचा हातअमरावती : अस्मानी आणि सुल्तानी संकटाच्या माऱ्याने जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल २८४७ शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे. सततची नापिकी, उत्पादन खर्चात झालेली वाढ, पावसाची अनियमितता, डोईवर असलेले कर्ज आणि कुटुंबांच्या उदरभरणाच्या प्रश्नांचे हे आत्मघाती बळी आहेत. सन २००१ पासून सुरू झालेले शेतकरी आत्महत्यांचे भयावह सत्र अरबोंच्या उपाययोजनांशी थांबलेले नाही. विदर्भातील वर्धा आणि अमरावती विभागातील पाच अशा सहा जिल्ह्यांना शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून जगात सर्वदूर अपप्रसिद्धी मिळाली. त्यात यवतमाळ पाठोपाठ सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद ‘अंबानगरी’त झाली. डॉ.पंजाबराव देशमुखांसारख्या ‘कृषी’रत्नांच्या जिल्ह्याच्या कपाळावरील शेतकरी आत्महत्यांचा काळा डाग कायमच्या पुसण्यासाठी उपाययोजनांचा पायंडा घालण्यात आला; तथापि अंमलबजावणीअभावी अरबो-खबरो रुपयांच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचल्याने शेतकरी आत्महत्यांचे सत्र अव्याहतपणे सुरू राहिले. निसर्गाचा बिघडलेला समतोल आणि अपुऱ्या, अवेळी येणाऱ्या पावसाने त्यात भर घातली. पाणी टंचाई व त्यामागोमाग येणाऱ्या भयाण दुष्काळानेही शेतकरी आत्महत्येसारखे आत्मघातकी पावलाकडे वळला. कर्ज वाटप असो की, कर्जाचे पुनर्गठन, सावकारी कर्ज असो की, खासगी सहकारी बॅँकांचे प्रत्येक बाबतीत शेतकरी नावडले जात आहे. त्याचाच दृश्य परिपाक शेतकरी आत्महत्यांचा वाढत्या घटनांमधून उघड होत आहे. लाखो रुपये उत्पादन खर्च लावून कापूस, सोयाबीनसारखी नगदी पिके हातची गेल्याने आणि तद्नंतर मुला-मुलींचे शिक्षण आणि त्यांचे लग्न कसे करायचे? या विवंचनेत शेतकरी परिस्थितीसमोर नतमस्तक होतो आहे. सन २००१ ते जून २०१६ या साढे पंधरा वर्षांत अमरावती जिल्ह्यात २,८४७ शेतकरी आत्महत्यांची नोंद शासन दरबारी आहे. त्यातील १,१३७ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे पत्र गनण्यात आली तर तब्बल १६७२ शेतकरी आत्महत्या मदतीच्या निकषासाठी अपात्र ठरविण्यात आल्या. ३८ प्रकरणे अद्यापही चौकशीसाठी प्रलंबित आहेत. ११३७ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांनी तुटपुंजी आर्थिक मदत देण्यात आली. मान्सून जोरदार बरसावा या चिंबवर्षावात शेतकरी आत्महत्यांचा डाग पुसून निघावा अशी तमाम शेतकरी कष्टकऱ्यांची आस आहे.