शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!
2
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 
3
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
4
भाजपचे १०५ उमेदवार ठरले; काही विद्यमान आमदारांना मिळणार डच्चू!
5
कलम ३७० रद्दचा निर्णय कायम ठेवणारे न्या. संजीव खन्ना होणार सरन्यायाधीश; ५१वे सरन्यायाधीश म्हणून ६ महिने राहणार पदाव
6
मुलासमोर लैंगिक संबंध, नग्न होणे लैंगिक छळच; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा - केरळ हायकोर्ट
7
रेल्वे प्रवासाचे आरक्षण आता १२० नव्हे, ६० दिवस आधी करा 
8
कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो तोंडघशी; ठोस पुरावे नव्हते
9
न्या. संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश! सरन्यायाधीश चंद्रचूड यांची शिफारस, ११ रोजी शपशविधी
10
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
11
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
12
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
13
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
14
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
15
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
16
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
17
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
18
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
19
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
20
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान

संघटनेतील कार्यकर्त्यांना उमेदवारीची स्वप्ने !

By admin | Published: November 02, 2016 12:32 AM

महापालिका निवडणूक आता तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे.

महापालिका निवडणूक : भाजप, काँग्रेसकडे इच्छुकांचा कलअमरावती : महापालिका निवडणूक आता तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. आरक्षण सोडत व प्रभाग रचना जाहीर झाल्याने निवडणुकीच्या घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, राजकीय पक्षात सक्षम, निवडून येणाऱ्या उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे. या वातावरणात इच्छुकांची लगबग आणि हुरहुरही वाढली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीत उमेदवारी मिळण्यापासून निवडून येण्यापर्यंत कार्यकर्त्यांना अपेक्षा असतात. परंतु ऐनवेळी होणाऱ्या पक्षांतरमुळे कार्यकर्त्यांना मिळणारी संधी हुकते आणि ते अस्वस्थ होतात. या पार्श्वभूमिवर आता उमेदवारी मिळविण्यापासूनच संघर्षात सुरूवात झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटमधून काँग्रेसमध्ये येणाऱ्या अन् पक्ष तिकिटासाठी दावेदारी ठोकणाऱ्यांमुळे काँग्रेसमध्ये एका चिंतेची लकिर उमटली आहे. त्यामुळे पलिकडून येणाऱ्यांना तिकिटे मिळते की, आपल्याला? याची हुरहुर अनेक विद्यमानांसह इच्छुकांना लागून राहिली आहे.महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि अनेक कार्यकर्त्यांना अपेक्षा असतात. पक्ष संघटनेत पक्ष मिळाल्यावर तो कार्यकर्ता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्याचे स्वप्न बघू लागतो. त्यासाठी आमदार, खासदारांसोबत पालकमंत्री व इतर मंत्र्यांचे कार्यक्रमाचे आयोजन करतो. पक्ष संघटनेचा कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडणुकीचा बिगूल वाजल्यावर त्याती उत्साह दुरावतो. तशीच परिस्थिती आजही आहे. मात्र, एकाच जागेवर दोनपेक्षा अधिक जणांनी दावेदारी केल्याने त्याचा उत्साह मावळतो. शहरात अनेक इच्छुकांबाबत ही परिस्थिती उद्भवली आहे. यात काँग्रेस आणि भाजप या दोन मुख्य पक्षांतील इच्छुकांचा संबोध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसफं्रटमधील खोडके समर्थक नगरसेवकांनी पंजावर दावेदारी केली आहे. तर दुसरीकडे लहान पक्ष आणि काही अपक्षही काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून नगरसेवक होण्याची स्वप्न दुभंगणार नाही ना? या हुरहुरीने काहींना ग्रासले आहे. २०१७च्या पूर्वार्धात ८७ जागांसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. प्रदेश आणि राष्ट्र अशा दोन्ही पातळींवर भाजपची सत्ता असल्याने भाजपकडे इच्छुकांचा सर्वाधिक कल आहे. त्यामुळे एकाच वार्डात भाजपच्या पक्षसंघटनेमध्ये वाहून घेतलेला कार्यकर्ता आणि दुसरीकडे आयात केलेले एकापेक्षा अधिक इच्छुक असा सामना रंगणार आहे. (प्रतिनिधी)श्रेष्ठींनी करावा विचारनिवडून येण्याची क्षमता हा पक्ष उमेदवारी मिळवण्याचा निकष असला तरी किमान ज्या ठिकाणी पक्षाची स्थिती आता अनुकुल आहे आणि थोडा आधार मिळाला तर कार्यकर्ता निवडून येऊ शकतो, तेथे तरी पक्षाने प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे.