आॅनलाईन लोकमतअमरावती : केळीच्या शेतात बसलेल्या अस्वलीला रेस्क्यू आॅपरेशनद्वारा गुरुवारी सायंकाळी पकडण्यात आले. अमरावतीच्या वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने अकोट तालुक्यातील रूईखेड येथे ही कार्यवाही केली.रुईखेड येथील एका केळीच्या शेतात अस्वल दबा धरून बसल्याची माहिती अकोला वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी तातखेडे यांनी अमरावतीच्या रेस्क्यू पथकाला दिली होती. त्यानुसार उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांच्या निर्देशाने रेस्क्यू पथक यवतमाळ सर्कलमधील रुईखेड रवाना झाले. गुरुवारी सायंकाळी रेस्क्यू पथकाने केळीच्या शेतातील अस्वलीची पाहणी केली असता, ती जखमी अवस्थेत असल्याचे दिसले. तिला बेशुद्ध करून पकडण्याचा निर्णय वनकर्मचाºयांनी घेतला. सायंकाळी ४.३० वाजता सुरू केलेले रेस्क्यू आॅपरेशन साडेपाचपर्यंत चालले. वनरक्षक अमोल गावनेर यांनी बंदुकीच्या साहाय्याने डॉट मारून बेशुद्ध केले. त्यानंतर अस्वलीला पिंजºयात टाकून अकोट वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले. तेथे पशुवैद्यकीय डॉक्टरांनी अस्वलीची तपासणी केली व तिला नागपूर येथील गोरेवाड्याच्या रेस्क्यू सेन्टरवर उपचारासाठी पाठविण्यात आले. अमरावती वनविभागाचे फिरते पथक व रेस्क्यू पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश धंदर, अमोल गावनेर, फिरोज खान, वीरेंद्र उज्जैनकर, सतीश उमक, मनोज ठाकूर, किशोर खडसे, अजय बावने वनपाल अकोट यांनी ही कार्यवाही केली असून, यावेळी वन्यप्रेमींनीही उपस्थित दर्शविली.
‘रेस्क्यू आॅपरेशन’द्वारा अस्वलीला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 10:13 PM
केळीच्या शेतात बसलेल्या अस्वलीला रेस्क्यू आॅपरेशनद्वारा गुरुवारी सायंकाळी पकडण्यात आले. अमरावतीच्या वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने अकोट तालुक्यातील रूईखेड येथे ही कार्यवाही केली.
ठळक मुद्देअकोटच्या रुईखेड येथील घटना : अमरावती येथील वनविभागाच्या पथकाची कार्यवाही