शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

मंथ एंडला अमरावती आगारातून वीस लालपरी धावणार बॅटरीवर

By जितेंद्र दखने | Published: March 06, 2024 10:00 PM

६० बसेसची डिमांड : मध्यवर्ती बसस्थानकातील कामे शेवटच्या टप्यात

अमरावती: जिल्ह्यात बसस्थानकांत इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग स्टेशन निर्माण केली जाणार आहेत. या कामाचे कार्यारंभ आदेश दिले आहेत. जिल्ह्यात अमरावती, परतवाडा, मोर्शी आणि वरूड या चार ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम सुरू आहे. जिल्ह्याला स्थानिक एसटी प्रशासनाने ६८ बसेसची मागणी केलेली आहे. यापैकी अमरावती आगारात लवकरच काम पूर्ण होणार आहे. तांत्रिक अडचणी दूर करून त्यानंतर या बसेस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. मार्चअखेर पहिल्या टप्प्यात २० इलेक्ट्रिक एसटी बस धावणार आहेत. लवकरच सर्वसामान्य जनतेचे प्रदूषणमुक्त वातानुकूलित प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.प्रदूषणाला आळा अन् खर्चात बचतवातावरणातील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच इंधनावरचा खर्चाचा भार कमी करण्यासाठी महामंडळाने इलेक्ट्रिक बसेस आपल्या ताफ्यात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अमरावती विभागात ६८ बस धावणार आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात २० बस मार्च एंडिंगपर्यंत अमरावती आगारात धावणार आहेत. यासाठी अमरावतीसह चार बसस्थानकांमध्ये चार्जिंग स्टेशनच्या कामाचे कार्यारंभ आदेश दिले आहेत.जिल्ह्यात चार्जिंग स्टेशनच्या कामाला वर्कऑर्डर देण्यात आली आहे. मार्चअखेरपर्यंत ५ हजार १५० पैकी पहिल्या टप्प्यात २०० इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात येणार आहेत. याबाबत संबंधितांना सूचना दिल्या आहेत. -नीलेश बिलसरे , विभाग नियंत्रक

तीन तासांत बसचे चार्जिंगएक बस पूर्ण चार्ज होण्यासाठी किमान तीन तासांचा अवधी लागेल. कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यास हा कालावधी आणखी वाढू शकतो, अशा ठिकाणी महावितरणकडून स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर दिला जाणार आहे. इलेक्ट्रिक बस एकदा चार्जिंग केल्यास किमान तीनशे किलोमीटर धावेल. डिझेलच्या तुलनेत विजेवर होणारा खर्च कमी आहे. एवढेच नाही तर देखभाल दुरुस्तीचा खर्चही बराच कमी आहे.अशी आहे बसच्या चार्जिंगची व्यवस्थाइलेक्ट्रिक बस चार्जिंग करण्यासाठी जिल्ह्यात चार आगारात चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महावितरण प्रशासनाकडून उच्चदाब वीजपुरवठा घेण्यात येणार असून, या स्टेशनवरून बसेस चार्जिंग करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Amravatiअमरावती