शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
4
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
5
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
6
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
10
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
11
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
12
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
13
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
15
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
16
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
17
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
18
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
19
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
20
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...

अट्टल चोर राम मढावी अटकेत

By admin | Published: September 06, 2015 12:14 AM

अट्टल चोर राम दिनेश मढावी (२४, रा. अंबाझरी, नागपूर) व त्याचा साथीदार अनिल आनंद आतराम (२१ ,रा. मसानगंज) या दोघांना ...

१९ गुन्ह्यांची कबुली : चोरींची २४ स्थळे दाखविलीअमरावती : अट्टल चोर राम दिनेश मढावी (२४, रा. अंबाझरी, नागपूर) व त्याचा साथीदार अनिल आनंद आतराम (२१ ,रा. मसानगंज) या दोघांना अमरावती पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अटक केली. आरोपींनी १९ गुन्हांची कबुली दिली असून चोरांनी पोलिसांना चोरीची २४ स्थळे दाखविली. वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता अमरावती पोलिसांनी तपासकार्य सुरु केले होते. चोरी झालेल्या घटनास्थळांची सीसीटीव्ही फुटेजवरून चार दिवसांपूर्वी पोलिसांनी आरोपींची शहानिशा केली. त्यानुसार पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, पोलीस निरीक्षक प्रमेश आतराम, सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे, पीएसआय दिलीप वाघमारे, पोलीस कर्मचारी गणेश काळे, चैतन्य रोकडे, दिपक श्रीवास, प्रणय वाघमारे, निलेश गुल्हाने, संदीप देशमुख, चालक संतोष रौराळे व दीपक देशमुख यांनी आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी रात्रीच्या वेळी व्यापारी प्रतिष्ठाने फोडून लाखो रुपयांचा माल लंपास केला आहे. यातील अट्टल चोर राम मढावी याला अंबाझरी, राणा प्रताप मगर, कोराडी सीताबर्डी व काटोल पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरूध्द विविध पोलीस ठाण्यांत ३० गुन्हे दाखल आहेत. चौकशीत आरोपींनी अमरावतीमधील २४ व्यापारी प्रतिष्ठाने फोडून चोरी केल्याची कबुल केले आहे. रविवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करुन पोलीस कोठडीची मागणी पोलीस करणार आहेत. या चोरट्यांकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)