शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी ‘एटीसी’ दोषी

By admin | Published: February 20, 2017 12:07 AM

राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी येथील आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त गिरीश सरोदे यांना दोषी ठरवीत...

नागपुरात गुन्हे दाखल : महाविद्यालयाचे संचालकही आरोपीच्या पिंजऱ्यातअमरावती : राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी येथील आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त गिरीश सरोदे यांना दोषी ठरवीत नागपुरात त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांची कागदपत्रे मिळवून बनावट नोंदी करीत विविध अभ्यासक्रमाला त्यांचा प्रवेश दाखवायचा आणि सरकारकडून त्यांच्या नावाने मिळणारी शिष्यवृत्ती हडपायची, असे शेकडो प्रकार उघड झाले आहे. या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी राज्य शासनाने विशेष तपास पथक (एसआयटी)कडे सोपविली होती. एसआयटीने आतापर्यंत २८८ संस्थामधील १ हजार ४१५ कोटींचा गैरव्यवहार अधोरेखित केला आहे. शुक्रवारी १७ फेब्रुवारी रोजी नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यात देवराम रुपचंद मरस्कोल्हे (रा. सडकअर्जुनी, जि.गोंदिया) यांच्या तक्रारीवरून अपर आयुक्त गिरीश सरोदे व विवेकानंद महाविद्यालयाचे संचालक भरत पोकुलवार यांना आरोपी बनविले आहे.सरोदे हे नागपूर येथे आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकार कार्यरत असताना शिष्यवृत्तीत घोटाळा झाल्याचे तपासाअंती एसआयटीने स्पष्ट केले आहे. प्राप्त माहितीनुसार, ३२ विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचा वापर करुन आरोपी भारत पोकुलवार याने प्रत्येकी २२ हजार ६०५ रुपये याप्रमाणे लाखोंची शिष्यवृत्ती २०१२-१३ मध्ये हडपली. पोकुलवारला या गैरव्यवहारात अदिवासी विकास विभागाचे अमरावतीचे अपर आयुक्त गिरीश सरोदे यांनी मदत केल्याचा आरोप आहे. त्यावरुन पोलिसांनी सरोदे, पोकुलवार या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. गत दोन महिन्यात नागपुरात दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. यापूर्र्वी बजाजनगर आणि जरीफटका ठाण्यात असे गुन्हे दाखल झाले आहेत. नागपूरचे पोलीस आयुक्त व्यंकटेशम आणि आणि उपायुक्त (ईओडब्ल्यू) ईशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती अनेक संस्थाचालकांच्या गैरव्यवहाराची कागदपत्रे लागली आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)शासनाला अमरावतीत सक्षम ‘एटीसी’ मिळेना?राज्य शासनाने येथील आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्तपदी गिरीश सरोदे यांच्या नियुक्तीपत्रात प्रशासकीय सेवेतील सक्षम अधिकाऱ्यांची पदस्थापना होईस्तोवर नियुक्ती करण्यात येत असल्याचे स्पष्टपणे नमूद आहे. खरे तर अमरावती एटीसी कार्यालयाचा कारभार हा १२ जिल्ह्यांमध्ये विस्तारलेला आहे. येथे आयएएस अधिकारी नेमण्यात यावे, अशी विविध आदिवासी संघटनांची मागणी आहे. मात्र विदर्भातील एका बड्या राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने सरोदे हे एटीसीपदी कायम आहेत.जिल्ह्यातील संस्थाही रडारवरविद्यार्थ्यांची कागदपत्रे जुळवून त्याआधारे शिष्यवृत्ती हडपणाऱ्या शैक्षणिक संस्थाचालकांची उलटी गिणती सुरू झाली आहे. यात काही संस्था जिल्ह्यातील असून लवकरच संस्थाचालक, दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असे एसआयटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.