शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

एटीएम 'हॉटलिस्ट' नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 10:19 PM

सायबर गुन्ह्यांच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने जुने एटीएम डेबिट कार्ड बंद करून नवीन डेबिट कार्ड देण्याचा निर्णय विविध बँकांनी घेतला आहे. परंतु, जुने एटीएम डेबिट कार्ड बदलवून घेतल्यानंतरही ते हॉटलिस्टेड (बंद) होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देबँकांकडे धाव : नवीन एटीएमला विलंब

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सायबर गुन्ह्यांच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने जुने एटीएम डेबिट कार्ड बंद करून नवीन डेबिट कार्ड देण्याचा निर्णय विविध बँकांनी घेतला आहे. परंतु, जुने एटीएम डेबिट कार्ड बदलवून घेतल्यानंतरही ते हॉटलिस्टेड (बंद) होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.नागरिकांना नव्याने मिळालेले डेबिटकार्ड बंद पडल्याच्या वाढत्या तक्रारी बँक अधिकाऱ्यांना प्राप्त होत असल्याने खातेदारांना पुन्हा नव्याने अर्ज करण्यास सांगण्यात येत आहेत. बँक आॅफ इंडियाच्या अनेक खातेदारांना या त्रासाचा सामना करावा लागत आहे.अनेक बँकांमधून खातेदारांच्या खात्यातून आॅनलाईन पद्धतीने पैसे चोरीला गेल्याच्या तक्रारी सायबर पोलीस ठाण्यात वाढल्या आहे. याला आळा बसावा याकरिता आरबीआयच्या निर्देशानुसार सर्व बँकांनी ३१ डिसेंबरला जुने एटीएम डेबिटकार्ड बंद करून खातेदारांना मास्टर चीप लावलेले नवीन डेबिटकार्ड देण्यात येत आहे.विविध बँकांच्या खातेदारांना नवीन मास्टर चीप लावलेले एटीएम डेबिट कार्ड घरपोच मिळाले आहेत. ज्यांना ते कार्ड मिळाने नाहीत, त्यांनी बँकांकडे धाव घेतली आहे. अनेकांना बँकेतून डेबिटकार्ड प्राप्त होत असून, अनेकांना मात्र अद्यापही डेबिटकार्डसाठी बँकांकडे धाव घ्यावी लागत आहे. ज्यांना नवीन डेबिटकार्ड मिळाले नाहीत, त्यांचे आर्थिक व्यवहार कोलमडले आहे.काही बँक ग्राहकांना नवीन डेबिटकार्ड मिळाल्यानंतर ते अ‍ॅक्टिव्हेट करण्यात आले. परंतु पुन्हा पैसे काढण्याकरिता गेले असता हॉटलिस्टेड झाल्याची स्लिप निघत आहे. त्याचप्रमाणे एटीएममध्ये एरर असल्याचा मॅसेज येतो. कार्ड हॉटलीस्ट झाल्याची स्लिप नागरिकांना प्राप्त होत आहे. त्यामुळे नागरिकांची डोकेदुखी आणखीच वाढत आहे. या मुद्यावर बँक अधिकाऱ्यांनी अधिकृत प्रतिक्रिया देण्याचे टाळले.बँक आॅफ इंडियातील लिस्ट आॅफलाईनजयस्तंभ चौकातील बँक आॅफ इंडियामध्ये ज्या खातेदारांचे नवीन डेबिट कार्ड आले आहेत, त्यांची माहिती अधिकाºयांनी येथे उपलब्ध केलेल्या रजिस्टर्ड बुकमध्ये नमूद आहे. मात्र, डेबिट कार्ड घेण्यासाठी येणाºया खातेदाराला जवळपास त्याचे नाव शोधण्याकरिता अर्धा ते एक तास लागत आहे. त्या कारणाने प्रत्येक नागरिकाला आपले महत्त्वाचे कामे सोडून येथे रजीस्टरमधील माहिती शोधण्यासाठी तासभतर वेळ द्यावी लागत आहेत. जर बँकेनीही ही माहिती आॅनलाईन केली व बँक कर्मचाºयांनी ते त्वरित खातेदारांना शोधून दिली. नागरिकांचा वेळ वाचले. त्या कारणाने ही माहिती आॅनलाईन करण्यात यावी, अशी अनेक खातेदारांची मागणी केली. आॅनलाईन करणे सुरू असल्याची माहिती शाखा व्यवस्थापकांनी दिली.आपला डेबिट कार्ड हरवले किंवा चोरीला गेला तरी डेबिट कार्डवर असलेल्या हॉटलिस्टिंग नंबरवर आपण कार्ड बंद करू शकतो. तो क्रमांक सुरक्षित ठिकाणी ठेवावा, कारण डेबिट कार्डाच्या मागील बाजूचे नंबर महत्त्वाचे आहे. अलीकडे आॅनलाइन सायबर क्राईमचे गुन्हे वाढले आहेत. याला आळा बसवा. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नवीन डेबिट कार्डमध्ये मास्टर चिप बसविली आहे. कुणी चुकीचा पासर्वड टाकण्याचा प्रयत्न केल्यास खातेदारांना व बँकेला मॅसेजव्दारे त्वरित ही माहिती पोहचते. यामुळे बँकाही अर्लट होतात, अशी माहिती बँक व्यवस्थापकांनी दिली.एटीएम हॉटलिस्ट झाले तर काय करावे?३१ डिसेंबर २०१८ रोजी जुने एटीएम डेबिटकार्ड बंद झालेल्या खातेदारांना विविध बँकांनी नवीन डेबिटकार्ड दिले. अशा खातेदारांनी संबंधित बँकेच्या एटीएमवर जाऊन कार्ड अ‍ॅक्टिवेट करून घ्यावे. त्याला नवीन पासर्वड द्यावा. बँकेत जो मोबाईल क्रमांक दिला असेल व ते सिम बंद असेल तर नवीन मोबाईल नंबर बँकेला द्यावा. कुठल्याही एटीएमवरून आॅनलाईन व्यवहार किंवा खरेदी करायची असेल तर ओटीपी येतो. (वन टाईम पासर्वड) तो मैसेज बंद असलेल्या नंबवर गेल्यास खरेदी होणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जर नवीन मास्टर डेबिटकार्ड हॉटलीस्ट होत असेल तर बँकेकडे पुन्हा नव्याने अर्ज करावा लागणार आहे.