दुचाकीची धडक, नाचोना येथील दोघा जखमी
दर्यापूर : खल्लार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाचोना येथील संजय श्यामराव आठवले व दिलीप नारायण वानखडे यांच्या एमएच २७ एएक्स ९८५८ क्रमांकाच्या दुचाकीला अन्य दुचाकी धडकल्याने १७ जुलै रोजी ते दोघे जखमी झाले होते. अकोट येथे जात असताना सांगळूद थांब्यावर ही घटना घडली. याप्रकरणी संजय आठवले यांनी सांगळूद येथील बंडू पाटील गावंडे नामक व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली. येवदा पोलिसांनी २९ जुलै रोजी गुन्हा नोंदविला.
------------
दुचाकीची धडक युवक जखमी
धारणी : तालुक्यातील लवादा फाट्याजवळ प्रकाश मधु बेठेकर (३१, रा. झिल्पी) यांच्या दुचाकीला एमएच २७ सीक्यू ६९४७ क्रमांकाच्या भरधाव दुचाकीची धडक बसली. यात प्रकाश हा जखमी झाला. त्याच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
--------------
खापरखेडा शिवारात रेतीची अवैध वाहतूक
धारणी : तालुक्यातील खापरखेडा शिवारात एमपी ६८ ए ४३५२ क्रमांकाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून रेती जप्त करण्यात आली. याप्रकरणी धारणी पोलिसांनी किरपाराम तुलसीराम भिलावेकर (३२, रा. भोकरबर्डी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ५ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
-------------
हॉटेलमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन
अमरावती : निर्धारित वेळेनंतरही हॉटेल महाराष्ट्र दरबार सुरू राहिल्याबद्दल गाडगेनगर पोलिसांनी रोहन विनोद बोबडे (२६, रा. शिवरसिक कॉलनी, कठोरा नाका) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. २९ जून रोजी ही कारवाई करण्यात आली.
--------------
चहा टपरीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ट्रेझरी ऑफिसपुढे दिलीप माणिकराव शेवाणे (६२, रा. अंध विद्यालय, अमरावती) याच्याविरुद्ध निर्धारित वेळेनंतर चहा टपरी सुरू ठेवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
------------
विक्रेत्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई
अमरावती : पान टपरीचालकअरविंद मुंगळे (४२), गुपचूप विक्रेता राजू बघेल (३६), भाजी विक्रेता उमेश धुर्वे (२८, नारळपाणी विक्रेता अभिजित गायकवाड (१८) यांच्याविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा नोंदविला. २८ जून रोजी ही कारवाई करण्यात आली.
------------
दोन जुगाऱ्यांना अटक
अमरावती : नरेंद्र कमलाकर सावळकर (५६, रा. यशोदानगर) व आमद शाह तुराब शाह (५४, रा. अन्सारनगर) यांच्याविरुद्ध अनुक्रमे फ्रेजरपुरा व नागपुरी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून रोकड व जुगार साहित्य जप्त करण्यात आले.
--------