चांदूर रेल्वे (अमरावती) : तालुक्यातील मांजरखेड (कसबा) येथील गावठी दारू अड्ड्यावर धाड टाकण्यास गेलेल्या चांदूर रेल्वे पोलिसांवर कुºहाडीने जीवघेणा हल्ला चढविण्यात आला. यामध्ये एका पोलीस कर्मचाºयाचा जागीच मृत्यू झाला, तर एक अत्यवस्थ आहे. ही घटना रविवारी सकाळी मजूर शेतात जात असताना उघडकीस आली.सूत्रांच्या माहितीनुसार, चांदूर रेल्वे पोलीस शिपाई सतीश मडावी (बक्कल नं.१५८९) असे मृताचे व एएसआय शामराव जाधव (बक्कल नं. १२२२) असे जखमीचे नाव आहे. दोघेही साध्या वेशात दुचाकीने मांजरखेड शिवाराजवळील पडीक जागेवर गावठी दारू तपासणीकरिता गेले होते. दरम्यान, गावठी दारूचा व्यवसाय करणाºयांनी दोघांवर कुºहाडीने प्राणघातक हल्ला चढविला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. आरोपींनी मडावी यांच्या डोके दगडाने ठेचल्याने ते रक्तबंबाळ अवस्थेत पडून होते. त्याच वाटेवरून सकाळी काही मजूर कामावर जात असताना त्यांना दोन पोलीस जखमी अवस्थेत दिसले. याची माहिती त्यांनी गावातील पोलीस पाटील व सरपंचांना दिली. त्यांनी सदर माहिती चांदूर रेल्वे ठाण्यात दिली. चांदूररेल्वेचे ठाणेदार ब्रम्हा शेळके यांच्या नेतृत्वात पोलीस पथक मांजरखेड येथील घटनास्थळी पोहचले. पोलिसानी सतीश मडीवी व शामराव जाधव यांना येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. जखमी शामराव जाधव यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.तेथून जाधव यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेचे गांभीर्य बघता पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावून आरोपींचा शोध सुरू केला. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. पोलीस छावणीचे स्वरूपघटनेचे गांभीर्य बघता चांदूर रेल्वे ठाण्यात अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली. पोलीस ठाण्यात जवळपास सात ते आठ गाड्या, हजारांवर पोलीस तैनात, दंगल नियंत्रण पथक, दरम्यान नागरिकांना पोलीस ठाण्यात येण्यास मज्जाव केला गेला.
एसपी पोहचले चांदूर ठाण्यातघटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक एम.एस. मकानदार यांनी चांदूर रेल्वे पोलीस ठाणे गाठले. घटनेची माहिती ठाणेदाराकडून जाणून घेतली. घटनास्थळी भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला. तणावाची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.
दोन पोलीस कर्मचारी गावठी दारू अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी गेले असता त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला व एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. संशयितांची चौकशी सुरु असून लवकरच आरोपीला अटक करू. एम.एस.मकानदार, अपर पोलीस अधीक्षक