ठळक मुद्देवलगाव डेपो स्कॉड कारवाई : अॅनिमल वेलफेअर बोर्डची दखल
लोकमत
न्यूज नेटवर्कअमरावती : रस्त्यावर बसलेल्या गार्इंना बाजूला करण्याचे प्रयत्न न करता थेट अंगावर वाहन नेणाऱ्या बसचालकास वलगाव डेपोच्या स्कॉडने सोमवारी शोकॉज नोटीस बजावली. सुदैवाने वेळेवर गाई उठल्या, अन्यथा बसच्या मागील चाकात गाय येण्याची शक्यता होती.अमरावती-परतवाडा बस क्रमांक एमएच ४० एन-९७७२ वलगाव चौकातून पुढे जात असताना रस्त्यावर गार्इंचा कळप बसला होता. एसटी चालकाने हार्न न देता व बे्रक न दाबता थेट एसटी गार्इंच्या अंगावर नेली. मात्र, गाई उठत नसल्याचे पाहून चालकाने गायींना कट मारून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. गाय मागील चाकात येणारच होती, तेवढ्यात गाई उठल्याने दुर्घटना टळली. एसटी चालकाने गायींच्या अंगावर मुद्दामच बस नेल्याचा प्रकार त्याच मार्गाने जात असलेल्या वलगाव एसटी डेपोचा स्कॉड व अॅनिमल वेलफेअर बोर्ड आॅफ इंडियाचे हॉनरली अॅनिमल वेलफेअर आॅफिसर सागर मैदानकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी एसटीचा पाठलाग करीत वलगाव डेपोत एसटीला गाठले. सागर मैदानकर या घटनेविषयी पोलिसात तक्रार करणार होते. मात्र, अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून त्यांनी तक्रार केली नाही. त्या एसटी चालकास डेपोच्या स्कॉडने शोकॉज नोटीस देऊन कारवाई केली.वलगावातील या घटनेविषयी माहिती नाही. चौकशी करून नेमके काय घडले ते तपासून पाहू.- श्रीकांत गभणे,विभागीय वाहतूक नियंत्रकएसटीच्या अधिकाऱ्यांचा स्कॉड व मी मागेच होते. आम्ही एसटीला वलगाव डेपोत गाठून चालकास जाब विचारला. चालकास 'शो कॉज' बजावली.- सागर मैदानकर, हॉनरली अॅनिमल वेलफेअर आॅफीसर