मोहन राऊत
अमरावती : राज्यात सर्वात प्रथम स्वच्छता अभियान अभियान प्रथम ठरलेल्या तालुक्यातील आदर्श ग्राम झाडाचे शिल्पकार विजय उगले यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न शनिवारी सकाळी दहा वाजता करण्यात आला. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
सध्या नागपूर येथे वास्तव्यास असलेले या गावाचे शिल्पकार विजय उगले हे पोळ्या निमित्य काल शुक्रवारी गावात आले होते. आज शनिवारी सकाळी आठ वाजता गावातून चिंचोली येथे आपले मित्र विलासराव जाधव यांना भेटण्यासाठी गेले आपल्या स्वीपट गाडी क्र एम एच २७ बी एन २६११ या चार चाकी ने खाली उतरताच याच वेळी गावातून त्यांचा ऑटो ने पाठलाग करीत आलेल्या शेख शब्बीर यांनी ऑटोतुन पेट्रोल ची डबकी काढत उगले यांच्या अंगावर टाकले खिशातून माचीस काढून पेटविली असता ती पावसामुळे पेटली नाही अश्यातच चिंचोली येथील ग्रामस्थ विजय उगले यांच्या मदतीसाठी धावले. विजय उगले यांनी मंगरूळ दस्तगिर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
आदर्श ग्राम म्हणून झाडाची ओळख
धामणगाव तालुक्यातील झाडा हे गाव सण१९८८ ते २००५ पर्यंत या गावाचे कृषी पदवीधर असलेले सरपंच म्हणून विजय उगले यांनी जबाबदारी सांभाळली तत्कालीन शिक्षण सचिव सुमित मलिक, सह अण्णा हजारे यांनी या गावाला भेट दिली त्यांच्या कार्यकाळात १२२ राज्य पुरस्कार या गावाला मिळाले हिवरेबाजार गावापूर्वी राज्यात हे आदर्श गाव विजय उगले यांच्यामुळे प्रकाश ज्योतात आले होते.आमचे गाव विजय उगले यांच्यामुळे प्रकाशज्योतात आले आज त्यांच्यावर जे पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला त्या घटनेला कोणीही समर्थन करणार नाही. आम्ही ग्रामस्थ या घटनेचा निषेध करतो. - चौधरी, सरपंच झाडा
फिर्यादी यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला याविषयी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. यासाठी तीन पोलीस पथक रवाना केली आहे. - दीपक वढवी, पोलीस उपनिरीक्षक, मंगरूळ दस्तगिर