युवक काँग्रेसचे सहा कार्यकर्ते ताब्यात : शेतकरी आंदोलनाची धग कायमचलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वाहन अडविण्याच्या बेतात असलेल्या काँॅग्रेस कार्यकत्यासह काही शेतकऱ्यांना पोलिसांनी रविवारी दुपारी ताब्यात घेतले. राजापेठस्थित गुलशन प्लाझा मार्केटजवळ सहा कार्यकर्ते आंदोलनाच्या पवित्र्यात होते. तथापि त्यांच्या आंदोलनाची चुणूक लागताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. माजी आमदार बी.टी.देशमुख यांच्या सत्कार सोहळ्यासाठी गडकरी शहरात दाखल होणार होते. तत्पूर्वी पोलिसांनी गांभीर्य पाहून कार्यकर्त्यांना आंदोलनापासून परावृत्त केले. जिल्हाभरात शेतकरी आंदोलनाची धग कायम असतानाच ना.नितीन गडकरी रविवारी अमरावती दौऱ्यावर आले. या पार्श्वभूमिवर काँग्रेसी कार्यकर्ते गडकरंींसमोर आंदोलनच्या तयारीत होते. ८ जून रोजी अर्थमंत्री सुधीर मुनगट्टीवार यांचे तिवस्यात वाहन अडवून काँग्रेसी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे रविवारी ना.गडकरींच्या दौऱ्यासाठी जिल्हाभरात पोलीस यंत्रणा तैनात असताना आंदोलनामुळे ती धास्तावली होती.त्यामुळे पोलिसांनी रविवारी तिवस्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केला होता. अमरावती शहरात सुद्धा पोलिसांनी तगडा बंदोबस्त केला होता. राजापेठच्या खुफिया विभागाला काँगे्रेसी कार्यकर्ते आंदोलनाच्या तयारीत असल्याची चुणूक लागली. गुलशन प्लाझा मार्केटजवळ एकत्रीत आलेले काँग्रेसचे वैभव वानखडे, अनिकेत देशमुख, सागर देशमुख, रुपेश केने, मंगेश भगोले व रामराव तांबेकर यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली. पोलिसांनी सहा कार्यकर्त्यांना "डिटेन" करून ठाण्यात नेले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. त्याचप्रमाणे शहरात काही ठिकाणी कार्यकर्ते व शेतकरी युवक आंदोलनाच्या तयारीत दबा धरून बसले होते. पोलीस बंदोबस्तामुळे त्यांचे प्रयत्न फसल्याची चर्चा आहे.तिवसा, मोझरीत पोलिसांचा चोख बंदोबस्त तिवसा : केंद्र्रीय मंत्री नितीन गडकरी तिवसामार्गे अमरावती जाणार असल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर तगडा बंदोबस्त होता. काही आंदोलक निषेध नोंदवू शकतात, अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावर तिवसा-मोझरी दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अमरावती-नागपूर महामार्गावर ग्रामीण पोलीस, दंगा नियंत्रक पथक तिवसा शहरात तैनात केले होते. दुपारी ४ वाजताच्या सुमारास बंदोबस्ताला सुरुवात झाली. यामुळे तिवसा ते मोझरी या दरम्यान कर्फ्यूसदृश स्थिती निर्माण झाली होती. परतीच्यावेळी रात्री ९ वाजता अशीच स्थिती होती. तीन दिवसांपूर्वी मोझरी येथे काही आंदोलकांनी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाहनावर चढून निषेध नोंदविला होता. याची पुनरावृत्ती होऊ नये, याची दखल पोलिसांनी घेतली होती. गडकरी यांच्या दौऱ्यासाठी ४०० पोलीस तैनातकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अमरावती दौऱ्यानिमित्त शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील नागपूर-अमरावती मार्गावर तब्बल ४०० पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. ठिकठिकाणी पोलिसांचे ताफे उभे राहून आंदोलनकर्त्यांवर करडी नजर ठेवून होते. यामध्ये १३ पोलीस निरीक्षक, ३० पोलीस उपनिरीक्षकांसह अन्य पोलीस शिपायांचा ताफा तैनात होता.
गडकरींचे वाहन अडविण्याचा प्रयत्न फसला
By admin | Published: June 12, 2017 12:05 AM