शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
4
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
5
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
6
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
7
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
8
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
9
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
10
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
11
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
12
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
13
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
14
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
15
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
16
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
17
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
18
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
19
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
20
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला

वृत्ती बदलली की बदल घडतोच

By admin | Published: November 09, 2016 12:25 AM

अजाण वयात ज्यांच्या डोक्यावरून मायेचे छत्र हरविले अशा चिमुकल्यांच्या जीवनात उजेड आणण्याचे काम आशादीप अनाथालय व भूमिपुत्र फाऊंडेशन करीत आहे,...

बच्चू कडू : आशादीप अनाथालयात दीपोत्सवसुमीत हरकुट चांदूरबाजारअजाण वयात ज्यांच्या डोक्यावरून मायेचे छत्र हरविले अशा चिमुकल्यांच्या जीवनात उजेड आणण्याचे काम आशादीप अनाथालय व भूमिपुत्र फाऊंडेशन करीत आहे, असे प्रतिपादन आ. बच्चू कडू यांनी टोंगलापूर येथील सत्यशोधक बहुउद्देशीय संस्थाद्वारा आयोजित ‘दीपोत्सव पूर्णामायेचा’ कार्यक्रमात केले. यावेळी अध्यक्षस्थानी आ. बच्चू कडू होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी किरण गित्ते, दीपक धोटे व सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ बाळसाहेब दराळे (नासा) हे होते. आ. कडू म्हणाले, मायेचे छात्र हरविलेल्या चिमुकल्यांच्या जीवनातील अंधार हा दरिद्रीचा आहे, अज्ञानाचा आहे तो अंधार दूर करण्याचे कर्तव्य प्रत्येकाचे आहे. त्यामुळे वृत्ती बदलावी लागेल. ती बदलली की बदल घडतो आणि त्यामुळे या अनाथाच्या जीवनातील अंधार कायमचा नष्ट होणार आहे.सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्थाद्वारा संचालित आशादीप अनाथालय व भूमिपूत्र फाऊंडेशनतर्फे आयोजित पूर्णामायेच्या काठावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी दानदात्यांनी चिमुकल्यांसाठी फटाके, फराळाच्या वस्तू, कपडे आणले होते. स्वत: जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी या अनाथालयातील चिमुकल्यासोबत दिवाळी साजरी केली. त्यामुळे या चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. या चिमुकल्यांनी स्वत: हाताने बनविलेले आकाश दिवे लावण्यात आले होते. या चिमुकल्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याकरिता परतवाडा, अमरावती, चांदूरबाजार येथून अनेक परिवार प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी संस्थेच्या अध्यक्षा नयना कडू यांनी प्रास्ताविकात आशादीप अनाथालयाची पार्श्वभूमी प्रस्तुत केली, तर यावेळी सचिव राहुल म्हाला, पल्लवी कडू, सोपान गोडबोले, विनोद जवंजाळ, शरद तायडे, सतीश मोहोड, राजाभाऊ ठाकरे, सुबोध क्षीरसागर, अंकुश जवंजाळ, गजानन ठाकरे आदी शेकडो नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन घोम, आभार प्रदर्शन जवंजाळ यांनी केले.