लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या महाविद्यालयीन उपकुलसचिवांनी मुंबई येथे नियमबाह्य विमानवारी करून प्रवासभत्ता उचल केल्याप्रकरणी त्रिसदस्यीय चौकशी समितीने अंकेक्षण विभागाच्या सहायक कुलसचिवांसह अधिकारी, कर्मचारी यांचे जबाब नोंदविले आहेत. याप्रकरणी बऱ्याच गंभीर बाबी समोर येतील, असे संकेत सूत्रांकडून मिळाले आहेत.येत्या ६ मार्च रोजी विद्यापीठाचा अर्थसंकल्प अधिसभेपुढे सादर होणार आहे. त्यानुसार प्रशासनाने तयारी चालविली असली तरी विरोधक अधिसभा सदस्यांनी काही प्रश्न, प्रस्तावांवर विद्यापीठ प्रशासनाची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. यात महाविद्यालयीन विभागाच्या उपकुलसचिव सुलभा पाटील यांचे नियमबाह्य विमानवारी प्रकरण आघाडीवर असणार आहे. आधीच्या अधिसभेत संतोष ठाकरे, विवेक देशमुख, प्रवीण रघुवंशी या सदस्यांनी आक्रमकपणे हा मुद्दा उचलला होता. विमानप्रवास झालाच नाही, तर बोगस प्रवास तिकीट आले कोठून, असा सवाल उपस्थित केला. याप्रकरणी ‘दूध का दूध, पानी का पानी’ झालेच पाहिजे, चौकशी करून अधिसभेसमोर अहवाल सादर करावा, अशी मागणी या त्रयींनी रेटून धरली. या मागणीच्या आधारे कुलगुरू चांदेकर यांनी चौकशी समितीसुद्धा गठित केली.अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली प्राचार्य अनंत मराठे, रवींद्र कडू यांच्या त्रिसदस्यीय समितीने वेगवान चौकशी चालविली आहे. अधिसभा सदस्यांचे लेखी जबाब नोंदविण्यात आले आहे. परंतु, विद्यापीठाच्या अंकेक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे नोंदविलेले जबाब धक्कादायक ठरणारे आहेत.२ मार्च रोजी अधिसभा सदस्यांना बोलाविलेनियमबाह्य विमान प्रवासभत्ताप्रकरणी अधिसभा सदस्यांना कागदपत्रे घेऊन २ मार्च रोजी चौकशी समितीपुढे हजर व्हावे लागणार आहे. यापूर्वी अधिसभेत मांडलेले मुद्दे आणि त्याअनुषंगाने असलेली कागदपत्रे चौकशी समितीकडे सादर करावी लागणार आहेत. अधिसभा सदस्य प्रवीण रघुवंशी यांना उपस्थित राहण्याबाबत पत्र प्राप्त झाले आहे.
नियमबाह्य विमानवारीप्रकरणी ‘अंकेक्षण’ जबाब नोंदविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 6:00 AM
येत्या ६ मार्च रोजी विद्यापीठाचा अर्थसंकल्प अधिसभेपुढे सादर होणार आहे. त्यानुसार प्रशासनाने तयारी चालविली असली तरी विरोधक अधिसभा सदस्यांनी काही प्रश्न, प्रस्तावांवर विद्यापीठ प्रशासनाची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. यात महाविद्यालयीन विभागाच्या उपकुलसचिव सुलभा पाटील यांचे नियमबाह्य विमानवारी प्रकरण आघाडीवर असणार आहे.
ठळक मुद्देअधिसभेत घमासान होणार : समितीची वेगवान चौकशी