अमरावती: एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असुद्दीन ओवेसी हे रविवारी अमरावतीच्या दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान येथील शासकीय विश्रामगृहात ओवेसी आले असता प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता तर ते प्रचंड चिडले.
शनिवारी मलकापूर येथील जाहीर सभेत नारेबाजी करण्यात आली. मी जे नाही बोललो ते देखील प्रसारीत करण्यात आले, असा आक्षेप खासदार ओवेसी यांनी घेतला. खोट्या बातम्या चालवू नका, किती खोट्या बातम्या चालविणार, मुस्लिमांचा तुम्ही किती द्वेष करणार, असेही ते म्हणाले. त्या ठिकाणी पोलिस होते.
तुम्ही खोट्या बातम्या चालविल्या तर मी गुन्हे दाखल करणार अशी तंबी देखील खासदार ओवेसी यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील हे सुद्धा होते. अमरावती येथील मुस्लीम बहुल भागात नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी ७ वाजता खासदार ओवेसी यांची जाहीर सभा होणार आहे.