शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

स्वत:च करा वीज देयकाचे आॅडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 10:07 PM

विजेचे बिल जास्त आल्यास कोणतीही शहानिशा न करता बरेचदा महावितरणला दोष देण्यात येते. चुकीच्या मीटर वाचनामुळे किंवा मीटरमधील तांत्रिक दोषामुळे हे होऊ शकते. प्रत्यक्षात दैनंदिन जीवनात वाढलेला वीजवापर बघितला व वीज बिलाचे स्वत:च आॅडिट केल्यास पडताळणी करता येते.

ठळक मुद्देविजेचा वापरही वाढला तांत्रिक, मानवी चुकांचाही दोष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विजेचे बिल जास्त आल्यास कोणतीही शहानिशा न करता बरेचदा महावितरणला दोष देण्यात येते. चुकीच्या मीटर वाचनामुळे किंवा मीटरमधील तांत्रिक दोषामुळे हे होऊ शकते. प्रत्यक्षात दैनंदिन जीवनात वाढलेला वीजवापर बघितला व वीज बिलाचे स्वत:च आॅडिट केल्यास पडताळणी करता येते.सध्याच्या काळात वीज ही प्रत्येकाची अत्यावश्यकच नव्हे, तर चैनीची गरज बनली आहे. पूर्वीच्या तुलनेत आज अनेक गरजा व दैनंदिन कामे वीज उपकरणांवरच अवलंबून आहेत. घर, कार्यालये, उद्योग, व्यवसाय, शेती, दुकाने वा कुठलेच ठिकाण याला अपवाद नाहीत. विजेवर चालणारी नवनवीन उपकरणे बाजारात येताहेत. त्यामुळे प्रत्येक घरी विद्युत उपकरणांची यादी वाढतच आहे. हे उपकरणे वाढली व त्याचा वापर वाढल्यास विजेचे बिलदेखील वाढून येणारच आहे. मात्र, वीज देयक हाती आले की, अनेकांच्या भुवया उंचावतात. माझा वापर एवढा नसताना वीज देयक भरमसाठ आल्याचे त्यांना वाटते.एखाद्या प्रकरणात कर्मचाऱ्याच्या दोषामुळे चुकीच्या मीटरवाचनामुळे किवा मीटरमधील तांत्रिक दोषामुळे हे होऊ शकते. मात्र, हे सर्वच बाबतीत ते शक्य नाही. त्यासाठी आपण आपल्या घरात, दुकानात व इतर ठिकाणी असलेली विजेची उपकरणे त्याचा वॅट व त्याचा दैनंदिन वापराची माहिती करून रोज खर्च होणाºया युनिटचा लेखाजोखा ठेवल्यास येणाºया वीज देयकाचे निदान करणे शक्य होईल.युनिटवरच वाढतात दरआपल्या वीज देयकाच्या मागे असलेल्या वर्गवारीनिहाय वीज देयकाचे प्रतीयुनिट दर दिलेले असतात. त्यामध्ये ० ते १००, १०० ते ३०० व ३०० ते ५०० व ५०० ते १००० युनिटचे संदर्भातील दर छापलेले असतात. त्यामुळे एखाद्या महिन्यात जास्त वीज युनिट वापरल्यास त्याचे दरही त्यातुलनेत वाढत असतात.वीज वापराचे करा नियोजनघरात विजेचा वापर करताना आयएसआय प्रमाणीत तारांचा तसेच उर्जा बचतीचे प्रमाणपत्र लाभलेल्या व स्टार लेबल असलेल्या उपकरणांचा वापर करावा,जेवढे जास्त स्टार तेवढी जास्त उर्जा बचत होते. आपल्याला उपकरणांचे वॅट, त्याचा दैनदिन वापर याची माहिती झाल्यास वीजबिलाचे नियोजन करण्यासाठी विजेच्या वापरावर लक्ष ठेवून वीजबिल कमी करता येते.-तर येणार वीज बिल कमीजर १००० वॅटचे उपकरणांचा १ तास वापर केलातर १ युनिट साधारणत: वीज खर्च होते. त्यामुळे एकूण विजेचे वॅट व १ युनिट विजेसाठी लागणारा वेळ यासंदभार्तील तक्ताची तुलना केल्यास व या सर्व बाबींची माहिती घेतल्यास व स्वत:च याचे आॅडिट केल्यास, वीजबचत करणे सोपे होईल व वापरलेल्या विजेचे बिल भरताना त्रास होणार नाही.