लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रवाशाने आॅटोत विसरलेला महागडा लॅपटॉप चालकाने बडनेरा पोलीस ठाण्यात जमा करून माणुसकीचा परिचय दिला आहे. या कामगिरीबद्दल ठाणेदार शरद कुलकर्णी यांनी आॅटोचालक शेख समीर शेख गुड्डु (३५,रा.बडनेरा) याला पुष्पगुच्छ देऊन गौरविले.आॅटोचालक शेख समीर हा एमएच २७-बीडब्ल्यू १७३५ क्रमांकाचा आॅटोने अमरावतीवरून बडनेरा प्रवासी घेऊन गेला. बडनेरात प्रवासी उतरविल्यानंतर शेख समिरला आॅटोच्या सिटवर एक महागडा लॅपटॉप दिसून आले. शेख समीरने त्या प्रवाशाचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. त्याने तो लॅपटॉप घेऊन बडनेरा पोलीस ठाणे गाठले. ठाणेदार शरद कुळकर्णी यांना घडलेला प्रकार सांगून तो लॅपटॉप ठाणेदारांच्या स्वाधीन केला. आॅटो चालकाची ही माणुसकी पाहून ठाणेदारही अंचभित झाले होते. त्यांची शेख समीरवर कौतुकाची थाप देऊन या माणुसकीबाबत आभार व्यक्त केले. ठाणेदारांनी तत्काळ पोलीस कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ बोलावून शेख समीरचा गौरव केला. यावेळी एपीआय इंगळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे, पीएसआय मारोडकर, जंगले, पोलीस कर्मचारी चेतन कराळे, यांच्यासह आदी उपस्थित होते.
आॅटोचालकाने प्रवाशाचा लॅपटॉप केला ठाण्यात जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 10:20 PM
प्रवाशाने आॅटोत विसरलेला महागडा लॅपटॉप चालकाने बडनेरा पोलीस ठाण्यात जमा करून माणुसकीचा परिचय दिला आहे. या कामगिरीबद्दल ठाणेदार शरद कुलकर्णी यांनी आॅटोचालक शेख समीर शेख गुड्डु (३५,रा.बडनेरा) याला पुष्पगुच्छ देऊन गौरविले.
ठळक मुद्देमाणुसकीचा परिचय : बडनेरा पोलिसांनी केला सत्कार