आॅनलाईन लोकमतअमरावती : तुषार भारतीय यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर एकाच कंपनीची फायनांशियल बिड उघडण्याचा अविवेकी डाव रचण्यात आला आहे. मात्र, त्यावर अधिकाऱ्यांचा स्वयंस्पष्ट अभिप्राय भारी पडणार असून त्यानंतर आयुक्तासंमोरही पेच उभा ठाकणार आहे. स्वच्छतेवर १५० कोटी रूपये खर्च करण्याची महापालिकेची आर्थिक स्थिती नसल्याचा अभिप्राय अधिनिस्थ यंत्रणेने दिल्यास निविदा उघडण्याचा निर्णय आयुक्तांसाठी आत्मघातकी ठरेल. त्यांच्या कार्यप्रणालीवरही संशय व्यक्त होईल. त्याअनुषंगाने अधिकाºयांचे अभिप्रायच इच्छुकांच्या डावावर पाणी फेरणार असल्याचे संकेत आहेत.उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी दिलेल्या अभिप्रायाचा धागा पकडून आयुक्तांनी पुन्हा एकदा स्वच्छता कंत्राटाची फाईल स्वयंस्पष्ट अभिप्रायासाठी परत पाठविली. १५० कोटींपेक्षा अधिकच्या या कंत्राटाबाबत सोमवारी स्वच्छता विभाग प्रमुखांचा अभिप्राय प्राप्त होईल. त्यानंतर ती फाईल उपायुक्त सामान्य नरेंद्र वानखडे व मुख्यलेखापरीक्षक प्रिया तेलकुंटे यांच्याकडे जाईल. मात्र, तिघांनाही अतिशय स्वयंस्पष्ट अभिप्रायासह प्रस्ताव मागण्यात आल्याने तिघेही वस्तुस्थितीदर्शक अहवाल देतील.२८ फेब्रुवारीपर्यंत अभिप्रायमागील २ महिन्यांपासून स्वच्छता कंत्राटाच्या फाईलचा प्रवास आॅफिस टू आॅफिस सुरू आहे. आधी आॅडिटर, अकाऊंट आॅफिसर, उपायुक्त आणि एमओएचने अभिप्राय दिलेत. मात्र, ते नाकारले गेले. नव्याने मागितलेले अभिप्राय २८ फेब्रुवारीपर्यंत येणे अपेक्षित आहे.एक वर्षासाठी कंत्राट देण्याचा डावपाच वर्षांसाठी १५० कोटी रूपयांचा स्वच्छता कंत्राट देण्यास भाजपसह विरोधकांचाही तीव्र विरोध आहे. आयुक्तही ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाहीत. गुडेवारांप्रमाणे आपल्यावरही या कंत्राटाची जबाबदारी निश्चित होईल, अशी साशंक भीती त्यांना आहे. त्यामुळे भारतीय यांचा कार्यकाळ संपल्यानंतर किमान एक वर्षभरासाठी स्वच्छता कार्पोरेशनला कंत्राट देण्यात यावा, कंपनीची फायनान्शियल बिड उघडावी, असा दबाव प्रशासनावर आहे. त्यासाठी आर्थिक बोलणीही पार पडली आहे.
‘अविवेकी’ डावावर अधिकाऱ्यांचा अभिप्राय ‘लयभारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:24 PM
तुषार भारतीय यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर एकाच कंपनीची फायनांशियल बिड उघडण्याचा अविवेकी डाव रचण्यात आला आहे.
ठळक मुद्दे१५० कोटींचे स्वच्छता कंत्राट : स्वयंस्पष्ट अहवाल देणार, आयुक्तांसमक्षही पेच