मोर्शी : येथील अंकुश घारड मित्र मंडळाने लॉकडाऊनच्या काळात अनेक सामाजिक उपक्रम राबविले. त्यांनी शहरातील प्रभाग क्रमांक ९ व कॉलनी परिसरातील भागात जाऊन नागरिकांना कोरोना तपासणी करून घेण्यासाठी गळ घातली. तेथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तेथे नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांची आरोग्य चाचणी करून घेतली. कंटेनमेंट झोनसह कॉलनी परिसर, प्रभाग क्रमांक ९, पोलीस स्टेशन परिसरात जाऊन जंतूनाशक फवारणी केली. रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
या सर्व उपक्रमामध्ये अंकुश घारड, निलेश रोडे, राजेश ठाकरे, नरेंद्र जिचकार, रुपेश वाळके, अंकुश ठाकरे, रुपेश मेश्राम, नीलेश गंथडे, बंटी नागले, गौरव उपसे, योगेश राऊत, अक्षय पांडे, गजानन वानखडे, शुभम तिडके, स्वप्नील निंभोरकर, धीरज महल्ले, सूरज महल्ले, लवकेश मकोडे, सौरभ काळे, गौरव सोनार, प्रफुल्ल वाघमारे, देवेंद्र माथनकर, कार्तिक ठाकरे, वैभव केवतकर, अमित देशमुख, अमोल केचे, सोपान मडघे, वैभव राऊत, सागर पंडागरे, नितेश असोलकर, अंकुश साठवणे, पंकज राऊत, अमित धारणे, अक्षय धांडे, विश्वजित काळे, अवि अमृतकर, घनश्याम कळंबे, विलास ठाकरे, गौरव गुल्हाने, कमलेश बरडे यांनी सहभाग घेतला.