अमरावती : जनआक्रोश फॉर बेटर टुमॉरो या रस्ता सुरक्षा संबंधित कार्यरत संघटनेच्यावतीने रस्ता सुरक्षा नियम आणि जनजागृती अभियान शहरात राबविण्यात आले. याअंतर्गत शहराच्या वाढत्या वाहतूक व्यवस्थेसाठी आवश्यक जनप्रबोधानाचे काम जनआक्रोश व अमरावती पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार असून, त्या अनुषंगाने ३ जुलैपासून जनआक्रोश संघटनेची शाखा अमरावती येथे सुरू करण्यात येणार आहे.
मागील १० वर्षांपासून हे जनजागृती अभियान संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. या शाखांचे यशस्वी संचालनानंतर अमरावती येथे शाखा सुरू करण्यात येणार आहे. याबाबत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस आयुक्त आरती सिंह, उपायुक्त विक्रम साळी, डीसीपी वाहतूक सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक काळे व पोलीस निरीक्षक अवचार यांच्याशी पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.
ट्रॅफिक सिग्नलचे पालन, झेब्रा क्रॉसिंग, सिटबेल्ट, हेल्मेट, कर्कश हॉर्न या विषयांवर आढावा घेण्यात आला. यावेळी अमरावती शाखेचे सदस्य नरेंद्र केवले, प्रवीण चारोपकर, यश सरोदे, किशोर कलोती, निशांत जोध, करण धोटे, यांच्याबरोबर जनआक्रोश नागपूर तर्फे संजय वधलवार, संजय डबली, आशिष नाईक, डॉ.रवींद्र हरदास आदींची उपस्थिती होती.