शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

बीए, बीकॉमचा निकाल लांबणीवर

By admin | Published: June 30, 2017 12:26 AM

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा बी.ए., बी.कॉम भाग १ अभ्यासक्रमाचा निकाल लांबणीवर पडला आहे.

विद्यार्थी संख्यावाढीचा परिणाम : द्वितीय सत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा बी.ए., बी.कॉम भाग १ अभ्यासक्रमाचा निकाल लांबणीवर पडला आहे. इयत्ता १२ वीनंतर प्रवेशीत विद्यार्थ्यांची अतिरिक्त संख्या वाढल्याने परीक्षा विभागावर ताण पडून निकाल लांबत असल्याबाबतचा दुजोरा परीक्षा विभागाने दिला आहे.विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा आटोपल्यानंतर त्या अभ्यासक्रमांचा निकाल ४५ दिवसांच्या आत लागणे अपेक्षित आहे. मात्र, बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी., भाग १ या अभ्यासक्रमांच्या परीक्षा आटोपून कधीचाच ५० दिवसांचा कालावधी लोटला आहे. निकाल लागत नसल्याने महाविद्यालयांनी द्वितीय सत्राचे अभ्यासक्रम वर्ग सुरू केले नाही. तसेच महाविद्यालयांमध्ये संभ्रम कायम आहे. परंतु परीक्षा विभागाने प्राचार्यांना पत्र पाठवून बी.ए., बी.कॉम भाग १ या अभ्यासक्रमांचे द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमांचे वर्ग सुरू करावे, असे आवाहन केले आहे. बी.ए., बी.कॉम भाग १ अभ्यासक्रमांसाठी एटीकेटी लागू असल्याने द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना आपसूकच प्रवेश दिला जातो. त्यामुळे बी.ए., बी.कॉम भाग १ च्या अभ्यासक्रमांचे निकाल तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर पडत असले, तरी द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमांचे वर्ग, शिकवणी थांबू नये, प्राचार्यांना कळविल्याची माहिती परीक्षा विभागाचे संचालक जयंत वडते यांनी दिली. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या आदेशानुसार याच येत्या आठवड्याभरात त्वरेने निकाल लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. बी.ए., बी.कॉम. भाग ३ चा निकाल लावण्यात आला आहे. अनुदानित प्राध्यापकांच्या भरोशावरच उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन करावे लागते. बी.ए., बी.कॉम भाग १ अभ्यासक्रमाला अतिरिक्त विद्यार्थी प्रवेशित संख्या दरवर्षाला वाढत आहे. मात्र मूल्यांकन करणारे प्राध्यापक वर्गाची संख्या तितकीच आहे. त्यामुळे निकालावर परिणाम होत आहे. उन्हाळी परीक्षांचे निकाल किमान आठ दिवस लांबतील, असे विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.