अमरावती : टँकरच्या धडकेत दुचाकीवरील बाप-लेक जखमी झाल्याची घटना गुरुवारी नांदगाव पेठ हद्दीतील मणिरत्नम फॅक्ट्रीजवळील रोडवर घडली. योगेश रवींद्र कापडे (२५ रा. नांदगाव पेठ) व रवींद्र कापडे अशी जखमींची नावे आहेत. योगेश हा वडिलांना घेऊन एमएच २७ बीएच ८६९१ क्रमांकाच्या दुचाकीने हॉस्पिटलमधून परत येत होते. त्यावेळी त्याच्या दुचाकीला एमएच ४८ एवाय ३०३५ या क्रमांकाच्या टँकरने धडक दिली. योगेश कापडेच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
000000000000000000000000
बडनेरा हद्दीत संशयिताला अटक
अमरावती : बडनेरा पोलिसांनी चांदणी चौकात गुरुवारी रात्री ऋतिक रामदास आत्राम (२० रा. आदिवासीनगर, बडनेरा) याला अटक केली. सहायक उपनिरीक्षक अहमद अली यांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना चांदणी चौक स्थित गोल्डन वाईन शॉपच्या बाजूला तो संशयित आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन भादंविचे कलम १२२ अन्वये गुन्हा नोंदविला.
0000000000000000000000
तीन वरली-मटका अड्ड्यावर धाडी
अमरावती : फ्रेजरपुरा, गाडगेनगर आणि भातकुली पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील वरली-मटका अड्ड्यावर गुरुवारी धाड टाकली. पोलिसांनी सहा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य जप्त केले. फ्रेजरपुरा पोलिसांनी राहुलनगरात एका महिलेला ताब्यात घेतले. गाडगेनगर पोलिसांनी अशोक अर्जुन भुयार (५६ रा. भीमनगर) आणि सुभाष गाडे (रा. सिद्धार्थनगर) यांना अटक केली. भातकुली पोलिसांनी दीपक केशव टाले (३१), सागर प्रल्हाद भुडलकर (२७) आणि शेख रसूल शेख आमद (तिन्ही रा. भातकुली) यांना अटक केली.
00000000000000000000
पाच अवैध दारूविक्रेत्यांना अटक
अमरावती : बडनेरा पोलिसांनी अकोला नाका परिसरात आयुष नरेश मेश्राम (१९ रा. माताफैल, बडनेरा) व लोकेश वीरेंद्र चौधरी (२० रा. गांधीनगर) यांना अटक करून एक हजाराची अवैध दारू जप्त केली तसेच गावठी दारूविक्री करताना अनिल पंढरी वानखडे व गणेश माधव गायकवाड (दोन्ही रा. दसरा मैदान) यांना अटक केली. त्यांच्याकडून एक हजार रुपयांची गावठी दारु जप्त केली. नांदगाव पेठ पोलिसांनी शासकीय वसाहत परिसरात एका महिलेला गावठी दारूची विक्री करताना पकडले.