लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : अवि, शेतात जाऊन लवकर परत ये. आईला दवाखान्यात घेऊन मी येतो. सायंकाळी सोबत जेवण करू, असे लाडक्या मुलाला म्हणत ते घरून निघून गेले. मात्र, अपघातात दोघेही दगावले. अपघातात गावाचा विकासकर्ता कारभारी गेल्याने तालुक्यातील कावली येथे स्मशानशांतता पसरली आहे.तीन हजार लोकवस्तीच्या गाव कावली येथील माजी सरपंच राजेंद्र तितरे (५२) व त्यांची पत्नी रजनी (४८) यांचा मंगळवारी यवतमाळपासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर घाटात अपघातात मृत्यू झाला. दोघेही धामणगावहून यवतमाळला दवाखान्यात जात असताना हा अपघात झाला. राजेंद्र तितरे यांचे वडील गुलाबराव तितरे हे शिक्षकी पेशा सांभाळून गावात येणाऱ्या पत्रांचे विनामूल्य वाटप करीत असत. त्यांच्या समाजसेवेचा वसा राजेंद्र यांनी घेतला. तब्बल दहा वर्षे ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळून गावात अनेक लोकपयोगी सुविधा त्यांनी पुरविल्या. राज्य, केंद्र शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी त्यांचा मोठा हातखंडा होता. भाजपचा झेंडा त्यांनी आयुष्यभर हाती घेतला.गावातील माणूस असो की परिसरातील कोणतीही व्यक्ती, त्यांना आरोग्यसेवा पुरवण्याची, त्यांची समस्या सोडवण्याची राजेंद्र तितरे यांची तळमळ होती त्यांच्या खांद्याला खांदा लावून पत्नी रजनी या समाजसेवेत कार्यतत्पर होत्या. काही दिवसांपासून किरकोळ आजारावर रजनी या यवतमाळ येथे उपचार घेत होत्या. त्यामुळे नेहमीप्रमाणे बुधवारी दोघे एकुलता एक अविनाश नामक मुलाला सांगून दोघेही यवतमाळ दिशेने निघाले. यवतमाळपासून अवघ्या बारा किलोमीटर अंतर असलेल्या घाटात ट्रकचा टायर फुटून तो त्यांच्या अंगावर उलटला. या अपघातात तितरे दाम्पत्य ठार झाले. गावात वार्ता धडकताच प्रत्येक मन हळहळले. विधान परिषदेचे आमदार अरुण अडसड यांनी थेट यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात धाव घेतली. गुरुवारी सकाळी ११ वाजता या दाम्पत्याच्या पार्थिवावर कावली येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
अवि बाळा, आम्ही लवकर परत येतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 1:46 AM
तीन हजार लोकवस्तीच्या गाव कावली येथील माजी सरपंच राजेंद्र तितरे (५२) व त्यांची पत्नी रजनी (४८) यांचा मंगळवारी यवतमाळपासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर घाटात अपघातात मृत्यू झाला. दोघेही धामणगावहून यवतमाळला दवाखान्यात जात असताना हा अपघात झाला. राजेंद्र तितरे यांचे वडील गुलाबराव तितरे हे शिक्षकी पेशा सांभाळून गावात येणाऱ्या पत्रांचे विनामूल्य वाटप करीत असत.
ठळक मुद्देघराबाहेर पडलेले जन्मदाते अपघातात दगावले : कावली गाव बुडाले शोकसागरात