लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू यांनी पहिल्यांदा १९९९ ला ‘विमाना’वर निवडणूक लढवली होती. बच्चू कडूंची ही पहिली निवडणूक. या निवडणुकीत त्यांचे विमान उडता-उडता थोडक्यात माघारले. केवळ २ हजार २२१ मतांनी ही निवडणूक ते हरलेत.निवडणुकीदरम्यान त्यांच्याकडे जिवाभावाची पहिल्या फळीतील नि:स्वार्थी कार्यकर्ता मंडळी होती. ती राबराब राबली. १९९९ च्या निवडणुकीची मतमोजणी अमरावतीला पार पडली. पहाटेच्या सुमारास या निवडणुकीचा निकाल आला तेव्हा या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. आपला उमेदवार हरला म्हणून रडणारे ते कार्यकर्ते प्रसिद्धी माध्यमांसह अमरावतीकरांच्या नजरेतून सुटले नव्हते.यानंतर बच्चू कडू २००४ मध्ये परत निवडणूक रिंगणात उतरले आणि त्याच कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून आणले. सध्या बच्चू कडू चौथ्यांदा निवडणूक जिंकलेत खरे; पण पहिल्या दोन निवडणुकीतील त्या पहिल्या फळीतील जिवाभावाच्या कार्यकर्त्यांची संख्या घटली. पहिल्या फळीतील अपवादात्मक चार-दोन कार्यकर्ते वगळता, या निवडणुकीत नवे कार्यकर्ते बघायला मिळालेत. किंबहुना आमदारकीच्या व्यापात बच्चू कडूंचेही त्या पहिल्या फळीतील जिवाभावाच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.बच्चू कडू केव्हा, कोणते आंदोलन करतील, कोणता गनिमी कावा मांडतील, याचा नेम नाही. अशातही बच्चूभाऊंचा शब्द अंतिम मानणारे आणि घरच्या शिदोरीवर आंदोलनात उडी घेणारे ते पहिल्या फळीतील कार्यकर्ते, २२ सप्टेंबर २००८ पासून बच्चू कडू यांनी नागरवाडी येथे सपत्नीक केलेले अन्नत्याग आंदोलन, अन्नत्यागानंतर जलत्याग, वेळ पडल्यास जीवन त्यागाची घोषणा करताच त्या जिवाभावाच्या कार्यकर्त्याच्या मनातील कालवाकालव शब्दापलीकडची हीच बच्चू कडूंची जमेची बाजू. चौथ्यांदा विजयी ठरलेल्या बच्चू कडू यांना आता त्या पहिल्या फळीतील जीवाभावाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्यांना मानसन्मानाने परत आपलेसे करण्याची हीच खरी वेळ आहे. जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांसमवेत मेळ बसवून बच्चू कडूंनी त्यांना सोबत ठेवणेही तेवढेच गरजेचे आहे.नेहमीच सत्तेसोबतबच्चू कडू निवडून येताच त्यांनी मतदारसंघाच्या विकासाकरिता सत्तापक्षासोबत राहणे पसंत केले. सत्तापक्षाला त्यांनी पाठिंबा दिला असला तरी स्वत:च्या भूमिकेशी त्यांनी कधीही तडजोड केलेली नाही. २००४ मध्ये राष्टÑवादी पक्षासोबत, २००९ मध्ये काँग्रेससोबत, २०१४ मध्ये भाजपसोबत, तर आता २०१९ मध्ये ते शिवसेनेसोबत आहेत.
बच्चू कडूंची पहिली निवडणूक ‘विमाना’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 11:00 PM
निवडणुकीदरम्यान त्यांच्याकडे जिवाभावाची पहिल्या फळीतील नि:स्वार्थी कार्यकर्ता मंडळी होती. ती राबराब राबली. १९९९ च्या निवडणुकीची मतमोजणी अमरावतीला पार पडली. पहाटेच्या सुमारास या निवडणुकीचा निकाल आला तेव्हा या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. आपला उमेदवार हरला म्हणून रडणारे ते कार्यकर्ते प्रसिद्धी माध्यमांसह अमरावतीकरांच्या नजरेतून सुटले नव्हते.
ठळक मुद्देजीवाभावाची मैत्री : पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांची संख्या घटली