शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

भ्रष्टाचार दडपविण्यासाठी ‘बॅकडेटेड’ पत्रव्यवहार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 10:12 PM

‘मल्टियुटिलिटी फायर रेस्क्यू वाहनातील अनियमितता दडपविण्यासाठी महापालिका प्रशासानातील काही धेंड्यांनी वृथा खटाटोप चालविल्याचे उघड झाले आहे. आपली यात नाहक बदनामी होत असून याचा सूत्रधार मात्र नामानिराळा असल्याची प्रतिक्रिया पालिका प्रशासनात उमटली आहे.

ठळक मुद्देउपायुक्त कार्यालयाचा प्रताप : आवक जावक क्रमांकच नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘मल्टियुटिलिटी फायर रेस्क्यू वाहनातील अनियमितता दडपविण्यासाठी महापालिका प्रशासानातील काही धेंड्यांनी वृथा खटाटोप चालविल्याचे उघड झाले आहे. आपली यात नाहक बदनामी होत असून याचा सूत्रधार मात्र नामानिराळा असल्याची प्रतिक्रिया पालिका प्रशासनात उमटली आहे. या संपूर्ण प्रकरणातील अनियमितता जगजाहीर होऊ नये, यासाठी बॅकडेटेड पत्रव्यवहार केल्याचा आरोप आहे.२ कोटी ४ लाख रुपये किमतीच्या ‘मल्टियुटिलिटी फायर रेस्क्यू वाहनाचा १६ डिसेंबर २०१७ रोजी कंपनीकडून पुरवठा करण्यात आला. तशी नोंद साठा रजिस्टरमध्ये घेतल्याचा दावा अग्निशमण अधीक्षकांनी केला. त्यांनीच ते वाहन योग्य ठरविले. निविदा सूचनेतील अटी, शर्ती व तांत्रिक तपशिलानुसार वाहनाचा योग्य पुरवठा झाल्याने देयक मंजूर करावे, अशी नोटशिट अधीक्षकांनी चालविली. वरिष्ठ लिपिक भारतसिंग चौव्हान यांनी त्या वाहनाची स्पेशिफिकेशननुसार पडताळणी केली. त्यानंतर वाहनाचा पुरवठा योग्यरित्या झाल्याचे उपायुक्त नरेंद्र वानखडे व आयुक्त हेमंत पवार यांना सांगितले. व दुसऱ्याच दिवशी देयकाची फाईल हातोहात फिरवून निधी एंटरप्रायजेसला १.९४ कोटी रुपये अदा करण्यात कि रोल उठविला. दरम्यान वाहन खरेदीेच्या निविदाप्रक्रियेतच घोळ झाल्याने प्रक्रिया रद्द करावी , अशी तक्रार महापालिकेसह मुख्यमंत्री, नगरविकास विभाग व लोकायुक्तांकडे करण्यात आली. त्यामुळे घाबरगुंडी उडालेल्या चौव्हान यांनी उपायुक्तांशी संपर्क करत वाहनात बºयाच त्रुट्या असल्याचे सांगितले. त्यापूर्वीच वाहन योग्य ठरविल्याने अधीक्षकांची कोंडी झाली. त्यामुळे लगेचच ते वाहन सुधारणेसाठी निधी एंटरप्रायजेसकडे परत पाठविण्यात आले. मात्र, ते वाहन परत केव्हा पाठविण्यात आले, याबाबतची कुठलीही नोंद महापालिकेकडे नाही. ही बाब आता काल-परवा उघड झाल्यानंतर मागाहून निधी एंटरप्रायजेसला पत्र पाठविण्यात आल्याचा आरोप आहे.अनियमितता दडपविण्यासाठी उपायुक्त आग्रहीअधीक्षक चौव्हान यांनी ते वाहन योग्य ठरविले. मात्र, त्या वाहनात त्रुट्या आढळल्या. स्पेशिफिकेशननुसार त्या वाहनात कंपोनंन्ट्स नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. मात्र, आता त्रुट्या म्हटल्यास चौव्हान अडकतील, असा विचार करण्यात आला. १६ डिसेंबरलाच उपायुक्त वानखडे यांनी निधी एंटरप्रयजेसला पत्राद्वारे वाहनात सुधारणा सुचविल्या. मात्र त्यास सुधारणेचा मुलामा चढविण्यात आला. या प्रकरणात वानखडेंनी चौव्हाण यांचा बचाव केला.अधीक्षकच संशयात१६ डिसेंबरला आलेले ते वाहन अधीक्षक चौव्हान यांनी योग्य ठरविले. देयक प्रस्तावित केले. १८ डिसेंबरला उपायुक्तांनी निधी एंटरप्रायजेसला पत्र लिहून त्या वाहनात अनेक सुधारणा सुचविल्या. मात्र १६ डिसेंबरला निधी एंटरप्रायजेसला सुधारणा सुचविणाºया पत्राला आवक जावक क्रमांक नाही. महापालिकेच्या कुढल्याही विभागात निधीला तसे पत्र गेल्याची नोंद नाही. विशेष म्हणजे १६ डिसेंबरच्या सायंकाळी वाहनाचा पुरवठा झाल्यानंतर त्याच दिवशी निधी एंटरप्रायजसेला सुधारणेचे पत्र पाठविण्यात आले. सोमवार १८ डिसेंबरला निधी एंटरप्रायजेसने महापालिकेला पत्र पाठवून वाहन परत मागविले. मात्र, त्या पत्राचीही महापालिकेच्या कुठल्याही विभागात नोंद नाही. त्यामुळे ते दोन्ही पत्र आता मागाहून जोडण्यात आल्याच्या आरोपाला दुजोरा मिळाला आहे.