शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

स्वच्छतेच्या दोन कोटींच्या बिलासाठी 'बॅकडेट' स्वाक्षरी; स्वच्छता ठेकेदारांनी लढविली शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 11:11 AM

Amravati : उपायुक्तांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा; फाईल आरोग्य विभागात पडून

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : महापालिकेत यापूर्वीच्या साफसफाई कंत्राटदारांच्या तब्बल दोन कोटी रुपयांच्या देयकांवर तत्कालीन आयुक्त देविदास पवार यांनी गुरुवार, २२ ऑगस्ट २०२४ रोजी 'बँकडेट' स्वाक्षरी केल्याची विश्वसनीय माहिती आहे. यात 'अर्थपूर्ण' राजकारण झाले असून, आता ही फाईल उपायुक्त (स्वच्छता) स्वाक्षरी करून ही देयके मंजूर करतात काय, याकडे महापालिका वर्तुळात नजरा लागल्या आहेत. हल्ली ही फाईल आरोग्य विभागात आहे.

येथील शासकीय विश्राम भवनात तत्कालीन आयुक्त देविदास पवार गुरुवारी आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पवार यांच्या कार्यकाळातील अगोदरच्या साफसफाई कंत्राटदारांची दोन कोटींची देयके प्रलंबित असल्याचे समजते. यात सुमारे २५ देयके असून, या देयकांची फाईल विश्राम भवनात महापालिका स्वच्छता विभागाचे प्रमुख आणि लिपिक हे घेऊन गेले होते. या फायलीवर तत्कालीन आयुक्त देविदास पवार यांनी साफसफाई कंत्राटदारांच्या समक्ष 'बॅकडेट' स्वाक्षरी केली. याकरिता 'अर्थपूर्ण' राजकारण झाले. मात्र, आता या 'बॅकडेट' देयकांच्या फाईलवर स्वच्छता विभागाच्या उपायुक्त आजच्या तारखेत स्वाक्षरी करतात की ही फाईल नाकारतात, हे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण, उपायुक्त या अमरावती महापालिकेत १२ जुलै २०२४ रोजी रुजू झाल्या आहेत. तथापि, स्वच्छतेच्या दोन कोटींची देयके ही त्या रुजू होण्यापूर्वीची आहेत. आठ ते दहा सफाई कंत्राटदारांची ही देयके आहेत. मात्र, तत्कालीन आयुक्त पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात ही फाईल मंजूर का केली नाही, हा संशोधनाचा विषय ठरत आहे.

शहरात खरेच स्वच्छतेची कामे झाली असेल, तर आता कंत्राटदारांची देयके अदा करण्यास टाळाटाळ का केली जाते, असाही सवाल महानगरपालिका वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.

आयुक्त सचिन कलंत्रे कोणता निर्णय घेणार? स्वच्छतेबाबत कंत्राटदारांची सुमारे दोन कोटींची देयके आता बॅकडेट'मध्ये तत्कालीन आयुक्त देविदास पवार यांनी मंजूर केली आहे. खरंतर पवार यांनी ४ जुलै रोजीच पदभार सोडला होता. आता या फाईलवर उपायुक्त यांची स्वाक्षरी होणे अनिवार्य आहे. अन्यथा ही फाईल पुढे आयुक्तांकडे जाणार नाही, अशी नियमावली आहे. सफाई कंत्राटदारांनी तत्कालीन आयुक्त पवारांना बोलावून स्वाक्षरी करून घेतली. त्यामुळे आता ही फाईल विद्यमान आयुक्त सचिन कलंत्रे मंजूर करतात काय, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

फॉर्म २२ वर उपायुक्त स्वाक्षरी करणार का? महापालिका उपायुक्त यांच्याकडे स्वच्छता विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे साफसफाईशी निगडित कंत्राटदारांची दोन कोटींची थकीत देयके अदा करण्यासाठी त्या फॉर्म २२ वर स्वाक्षरी करणार का? याकडे अवघ्या महापालिका प्रशासनाचे लक्ष लागले आहे. हल्ली या देयकांची फाईल आरोग्य विभागात असून, तत्कालीन आयुक्त देविदास पवार यांनी गुरुवारी ओके केली आहे. त्यामुळे या 'बॅकडेट' फाईलवर उपायुक्त यांनी स्वाक्षरी केल्याशिवाय कंत्राटदारांना देयके मिळणार नाही, हेसुद्धा तितकेच खरे आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती