शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

‘बॅकडोअर एन्ट्री’चा प्रस्ताव माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 10:22 PM

सहायक पशुशल्य चिकित्सक सचिन बोंद्रे यांच्या स्थायी नियुक्तीबाबत चर्चा करून निर्णय घेण्याचा प्रस्ताव मागे घेण्यात आला आहे. याप्रकरणी भाजप सदस्यांवर काँग्रेसी सदस्यांनी दबाव आणून हा प्रस्ताव मागे घेण्यास बाध्य केल्याचे वास्तव उघड झाले आहे. बोंद्रे यांनी त्यांच्या गॉडफादरकरवी फिल्डिंग लावून नोकरी वाचविल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होऊ लागली आहे.

ठळक मुद्देराजकारण : भाजप सदस्यांवर दबाव कुणाचा, सत्ताधाऱ्यांची पारदर्शकता विरोधकांच्या दावणीला
<p>लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सहायक पशुशल्य चिकित्सक सचिन बोंद्रे यांच्या स्थायी नियुक्तीबाबत चर्चा करून निर्णय घेण्याचा प्रस्ताव मागे घेण्यात आला आहे. याप्रकरणी भाजप सदस्यांवर काँग्रेसी सदस्यांनी दबाव आणून हा प्रस्ताव मागे घेण्यास बाध्य केल्याचे वास्तव उघड झाले आहे. बोंद्रे यांनी त्यांच्या गॉडफादरकरवी फिल्डिंग लावून नोकरी वाचविल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होऊ लागली आहे.सचिन बोंद्रे यांच्या महापालिकेत आस्थापनेवरील नियुक्तीवर अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. त्यांच्या या बॅकडोअर एन्ट्रीबाबत नगरविकास विभागाकडूनही चौकशी सुरू आहे. मात्र, जीएडीच्या अधिकाºयांनी बोंद्रेंना वाचविणारा अहवाल पाठविल्याने तूर्तास हे प्रकरण थंडबस्त्यात पडले आहे. नगरविकास विभागाच्या कक्ष अधिकाºयाने याबाबत आयुक्तांना वस्तुनिष्ठ व स्वयंस्पष्ट अहवाल मागितला. मात्र प्रशासनाने ‘गोलगोल’ अहवाल पाठवून बोंद्रेंना अभय दिले. कुठलीही शासकीय जागा सेवाप्रवेश नियमानुसार भरली जाते. जाहिरात, समांतर आरक्षण, मुलाखती अशा सर्व टप्पे पार करणाºयांची नियुक्ती केली जाते. मात्र, सचिन बोंद्रेबाबत या नियमांना हरताळ फासण्यात आला. शासनाने सहायक पशूशल्य चिकित्सक या पदाला मान्यता दिल्यानंतर आमसभेतून बोंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती चुकीची असल्याचे हेमंत पवार यांनीही अनौपचारिकरीत्या बोलताना स्पष्ट केले होते. मात्र, अहवाल पाठवताना त्यांनी आमसभेमधील नियुक्तीबाबत कुठलेही स्पष्ट मत दर्शविले नाही. या पार्श्वभूमिवर बोंद्रे यांच्या नियमबाह्य नियुक्तीबाबत भाजपचे गटनेता सुनील काळे, धीरज हिवसे आणि चेतन गावंडे यांनी प्रस्ताव दिला. १६ एप्रिल २०१८ च्या आमसभेतील विषयपत्रिकेमध्ये या प्रस्तावाचा अंतर्भाव आहे. बोंद्रेंच्या नियमबाह्य नियुक्तीबाबत चर्चा करून निर्णय झाल्यास अनियमितता चव्हाट्यावर येईल. बोंद्रेंची नियुक्ती नियमबाह्य ठरविल्यास सभागृहाची प्रतिमा मलिन होऊ शकते, असा डोज प्रस्तावधारकांना देण्यात आला. त्यामुळे जुलैच्या आमसभेपूर्वी बोंद्रेंबाबतचा प्रस्ताव माघारी घेण्यात आला. यात मोठे राजकारण करण्यात आले. पारदर्शक प्रशासनाचा शब्द देत भाजपने सत्ता काबीज केली. मात्र, बोंद्रे यांच्या नियमबाह्य नियुक्तीबाबतचा प्रस्ताव मागे घेऊन भाजपलाही बेकायदा प्रवेशलेले अधिकारी हवे आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.आमसभेत चर्चा होऊन बोंद्रेंना काढण्याचा निर्णय झाल्यास यंत्रणा ढासळेल. तूर्तास बोंद्रेंना पर्याय उपलब्ध नाही. गुरा-ढोरांवरील कारवाईस ब्रेक लागल्यास ओरड झाली असती. त्यामुळे प्रस्ताव मागे घेतला.- धीरज हिवसे,नगरसेवक, भाजपपशुवैद्यकीय विभागाची कारवाई ढेपाळली होती. मोकाट श्वान, वराहांच्या प्रश्नावर सभागृहात जाब विचारला जात होता. तथापि, आता बोंद्रेंनी कामास सुरूवात केली आहे. त्यामुळे प्रस्ताव मागे घेण्यात आला.- चेतन गावंडे,नगरसेवक, भाजपसचिन बोंद्रेंविषयी सार्वत्रिक ओरड होती. महिला नगरसेविका अधिक आक्रमक होत्या. त्यामुळे प्रस्ताव टाकला. तथापि, आता बोंद्रेंनी कारवाईस सुरुवात केली आहे- सुनील काळे,सभागृहनेता, भाजप