लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : गत वर्षभरापासून सुरू असलेल्या परतवाडा-अकोट रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात दिवसभर तुरळक अपघातांची मालिका सुरू आहे. वळण मार्गावर आवश्यक त्या सुविधा कंत्राटदार व संबंधित कंपनीने रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसाठी केल्या नाहीत. त्यामुळे दररोज रस्त्याने अपघात घडत आहेत. पाच दिवसांत रस्ता दुरुस्तीचे काम न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा प्रहार पक्ष संघटनेने देण्यात आला आहे.पथ्रोट नजीकच्या गणोरकर विद्यालयाजवळ दोन महिन्यापूर्वी अंजनगाव शाळेत मुलांना भेटण्यासाठी जाणाºया आदिवासी दाम्पत्याचा दुचाकीला खराब रस्त्यांमुळे अपघात झाला. त्यामध्ये मागून येणाºया ट्रकने महिलेस चिरडले होते. मंगळवारी रात्री ८ वाजता पुलासाठी खोदकाम केलेल्या खड्ड्यात दुचाकीसह पडून बंटी पवारचा मृत्यू झाला. कंत्राटदार रस्त्यांवर पाणी टाकत नसल्याने दिवसभर धुळीचे साम्राज्य असते. त्यामुळे दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा महामार्ग ठरला आहे. परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन दररोज ये-जा करतात. तरीसुद्धा संबंधित अधिकारी व कंत्राटदार रस्ता बांधकामात नियम धाब्यावर बसून कामे करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रात्रीला स्पष्ट दिसणारे रेडियमचे दिशादर्शक, खड्ड्याच्या ठिकाणी प्रकाश व्यवस्था आदी सर्व नियमानुसार करण्यात आले नाहीत. त्यामुळे बंटी पवारचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या कंत्राटदार व कंपनीच्या संचालकांना अटक करण्याची मागणी प्रहार पक्ष संघटनेतर्फे करण्यात आली आहे.बंटीवर अंत्यसंस्कारमंगळवारी रात्री अपघातात मृत झालेला प्रहार कार्यकर्ता बंटी पवार याच्यावर बुधवारी सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेकडोंच्या संख्येने प्रहार कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.रस्ता चौपदरीकरण कामात नियमानुसार आवश्यक त्या सुविधा सूचनांचे पालन संबंधित कंपनी व कंत्राटदाराने केले नाही. त्यामुळे अपघात होऊन जीव जात आहेत. पाच दिवसांत दुरुस्ती न झाल्यास प्रहारचा दणका दाखवू- आमदार बच्चू कडूअचलपूर विधानसभा मतदारसंघ
परतवाडा-अकोट रस्ता जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 1:24 AM
गत वर्षभरापासून सुरू असलेल्या परतवाडा-अकोट रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात दिवसभर तुरळक अपघातांची मालिका सुरू आहे. वळण मार्गावर आवश्यक त्या सुविधा कंत्राटदार व संबंधित कंपनीने रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसाठी केल्या नाहीत.
ठळक मुद्देअपघातांची मालिका : निर्माणाधीन मार्गावर युवकाचा बळी, प्रहारतर्फे पाच दिवसांचा अल्टिमेटम