लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांतून परतवाडा बसस्थानकाचे रूपडे पालटणार आहे. जुन्या बसस्थानकाशेजारी एक आकर्षक गोलाकार इमारत साकारली जाणार आहे. याकरिता १ कोटी १० लाखांचा निधी आमदार कडू यांनी खेचून आणला आहे. अल्पावधीतच ही आकर्षक इमारत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.या गोलाकार इमारतीतील प्रवाशांच्या प्रतिक्षालयासमोर प्रवाशांच्या दिशेने एकाच वेळेस बारा बसेस उभ्या राहणार आहेत. यात प्रवाशांना बसल्या जागेवरच बसचा फलक दिसणार आहे. बसची माहिती उपलब्ध होणार आहे. या नव्या कामाला अधिक आकर्षक बनविण्याकरिता ग्रॅनाइटचे फ्लोअरिंग दिले जाणार आहे. प्रवाशांना सरळ मुख्य रस्त्यावरूनच बसस्थानकात प्रवेश घेता येणार आहे. उन, वारा, पावसापासून प्रवाशांचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने मुख्य रस्ता, प्रवेशद्वारापर्यंत स्लॅबसह पोर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. या पोर्चमधून प्रवासी बसस्थानकात पोहोचतील. एसटी बसेसकरिता येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी दोन स्वतंत्र मार्ग आहेत. या मार्गाव्यतिरिक्त प्रवाशांकरिता ये-जा करण्याकरिता एक आणि पार्किंगमध्ये गाड्या लावण्याकरिता एक असे स्वतंत्र दोन प्रवेशद्वार ठेवण्यात आले आहेत. परतवाड्याला सर्वप्रथम १९६९ ला एसटी डेपो अस्तित्वात आला. एक मजबूत नवी इमारत त्यादरम्यान या एसटी डेपोला मिळाली. १९६९ मधील या इमारतीचेही मजबुतीकरण, नूतनीकरण, सौंदर्यीकरण, रंगरंगोटी व नव्या टाइल्ससह या नव्या गोलाकार इमारतीच्या सोबतीने केल्या जाणार आहे. यात प्रवाशांकरिता प्रतीक्षालयासह सुसज्ज चौकशी कक्ष, हिरकणी कक्ष, पोलीस चौकी, पास कक्षासह अद्ययावत सुसज्ज इमारत समाविष्ट आहे.१८ हजार प्रवासीपरतवाडा बसस्थानकावरून दररोज १८ ते २० हजार प्रवासी ये-जा करतात. पावसाळ्यातही दररोज ११ हजार प्रवासी ये-जा करतात. अमरावती, बडनेरानंतर परतवाडा डेपो सर्वात मोठा डेपो मानला जातो. आधी या डेपोतील रस्ते उखडले होते. सर्वत्र खड्डे पडले होते. पावसाचे पाणी सर्वत्र परिसरात साचत होते. प्रवासी, बसचालक वाहक यांना नााहक त्रास होत होता. आमदार बच्चू कडू यांनी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देऊन ही समस्या कायमची निकाली आहे.पाचशे ते सातशे फेऱ्यापरतवाडा बसस्थानकावरून २५० फेऱ्या जाणाऱ्या आणि २५० फेऱ्या येणाऱ्या अशा पाचशे फेºया ये-जा करतात. उन्हाळ्यात याच फेºया ७०० च्या आसपास जातात. मेळघाटचे कंट्रोलिंग याच डेपोतून होत आहे. औरंगाबादपासून इंदूरपर्यंत लांब पल्ल्याच्या बसगाड्या याच डेपोतून जातात. त्यामुळे ही प्रवाशांंसाठी मोठी उपलब्धी मानली जाते.
परतवाडा एस.टी. डेपोचे रूपडे पालटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:58 AM
गोलाकार इमारतीतील प्रवाशांच्या प्रतिक्षालयासमोर प्रवाशांच्या दिशेने एकाच वेळेस बारा बसेस उभ्या राहणार आहेत. यात प्रवाशांना बसल्या जागेवरच बसचा फलक दिसणार आहे. बसची माहिती उपलब्ध होणार आहे. या नव्या कामाला अधिक आकर्षक बनविण्याकरिता ग्रॅनाइटचे फ्लोअरिंग दिले जाणार आहे. प्रवाशांना सरळ मुख्य रस्त्यावरूनच बसस्थानकात प्रवेश घेता येणार आहे
ठळक मुद्देबच्चू कडू यांचा पाठपुरावा : एक कोटी १० लाखांचा खर्च