अस्थी विसर्जनाकरिता येणाऱ्यांची गैरसोय कोण दूर करणार? स्नानगृहाची आवश्यकता, घाटाच्या आजूबाजूला घाण
कुऱ्हा : विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व तिवसा तालुक्यातील प्राचीन तीर्थक्षेत्र असलेले श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील वर्धा नदीघाटावरील अस्थी विसर्जनस्थळी येणाऱ्यांची गैरसोय होत आहे. घाटाच्या आजूबाजूला घाण पसरली आहे. या ठिकाणी तातडीने स्नानगृहाची उभारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केले आहे.
घाटावरील नदीच्या पाण्यापर्यंत पायऱ्या आहेत. पण, त्या ठिकाणी बाजूलाच काठावर बांधलेल्या खोलीपासून बाहेरील भागात रस्ता असणे तितकेच गरजेचे आहे. कारण अस्थी विसर्जनाला येणाऱ्या उन्हाचे चटके घेत तेथे थांबावे लागते. लागत आहे. घाटाच्या दोन्ही बाजूला घाण साचलेली आहे.
कौंडण्यपूर येथे नदीला असलेल्या भरपूर पाण्यामुळे येथील अस्थी विसर्जन घाटावर दररोज गर्दी असते. कोरोनाची बाधा टाळण्यासाठी या घाटाची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणीदेखील होत आहे.