ठळक मुद्देप्रवाशांना दिलासा : महापालिका प्रशासनाने घेतली दखल
<p>लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : जंक्शन म्हणून ओळख असणाऱ्या बडनेरा रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरचा खड्डा ‘लोकमत’च्या वृत्तानंतर बुजविण्यात आला. त्यामुळे पावसाचे पाणी साचणार नाही, तेवढा दिलासा प्रवाशांसह वाहनचालकांना मिळाला आहे.रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूने भले मोठे खड्डे पडल्याने तेथे पावसाचे पाणी साचत होते. पायी चालणाºया प्रवाशांना डबक्यातून मार्ग काढावा लागत होता. ‘बडनेरा रेल्वेस्थानकाचे प्रवेशद्वारच खड्ड्यात’ या मथळ्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच प्रशासनाने हा खड्डा मुरूम टाकून बुजविला. तात्पूरता दिलासा यातून प्रवाशांसह वाहन चालकांना मिळाला आहे. बडनेरा रेल्वे स्थानकावर शेकडो प्रवासी रोज ये-जा करतात. वाहनांची सारखी वर्दळ असते. याचा विचार करून महापालिका प्रशासनाने पक्का रस्ता तयार करावा, अशी मागणी नागरिकांची आहे. पुन्हा पाऊस बरसल्यानंतर टाकलेला मुरूमदेखील उखडेल व जैसे थे स्थिती निर्माण होईल, असेही बोलले जात आहे.बडनेरा रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील खड्डा बुजविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 10:32 PM