लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेरा, अकोली आणि अमरावतीच्या मॉडेल रेल्वे स्थानकावर ओव्हर ब्रिज साकारले जाणार आहे. तसेच प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी ५१ कोटींच्या विविध विकासकामांचे कार्यारंभ आदेश रेल्वे मंत्र्यालयातून निघाल्याची माहिती खा. आनंदराव अडसूळ यांनी रविवारी पत्रपरिषदेतून दिली.मॉडेल रेल्वे स्थानकावर एकूण चार प्लॅटफार्म असून, त्याकरिता भुयारी मार्गाने ये-जा करावी लागते. मात्र, भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी साचत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होऊन अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे मॉडेल रेल्वे स्थानक ते रॅलीज प्लॉटकडे जाणाऱ्या तिकीट आरक्षण केंद्राजवळ आणि रेल्वे स्थानक ते जयस्तंभ चौकाकडे जाण्यासाठी एफ.ओ.बी. मंजूर झाला आहे. या कामांचे कार्यारंभ आदेशदेखील जारी झाल्याचे खा. अडसूळ यांनी सांंगितले. मॉडेल रेल्वे स्थानकावर मोफत वाय-फाय सुविधा सुरू झाली आहे. बडनेरा रेल्वे स्थानकावर नागपूरमार्गे ये-जा करणाºया प्रवाशांसाठी नवीन ३ कोटी ५० लक्ष रूपयांचे ओव्हर ब्रिज निर्माण केले जाणार आहे. दोन्ही प्लॅटफार्मवर लिफ्ट आणि सरकते जिने (ईलेक्ट्रॉनिक्स पायºया) प्रस्तावित आहे. नरखेड रेल्वे मार्गावरील नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर (अकोली स्टेशन) प्लॅटफार्म क्र.१ व २ ये-जा करण्यासाठी फूट ओव्हर ब्रिज तयार केले जाणार आहे. चांदूर रेल्वे स्थानकावर नवीन प्लॅटफार्म व एफओबी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. शिराळा रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबे, शकुंतला पॅसेंजर चे रेल्वे लाईन ‘जैथे थे’ ठेवून ही लाईन मजबूत करण्याबाबत प्रस्ताव आहे. धूळघाट रेल्वे लाईन ब्रॉडगेज होईल. बडनेरा येथील रेल्वे वॅगन दुरूस्ती कारखान्याच्या निर्मितीला वेग येणार आहे.बडनेरा रेल्वे स्थानकावर असलेल्या ब्रिटिशकालीन आरक्षण केंद्र, बांधकाम विभागाचे कार्यालय, रेल्वे पोलीस ठाणे, गोदाम इमारती तोडून त्याऐवजी अद्ययावत तिकीट आरक्षण केंद्र, विश्रामगृह, नवीन प्लॅटफार्म, शहर बसथांबा, वाहनतळ, आॅटोरिक्षा थांबा आदी विकास कामांना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मंजुरीचे आदेश दिले आहे. बडनेरा ते अमरावतीकडे जाणाºया ओव्हर ब्रिज चौपदीकरणाचे काम मंजूर झाले आहे. मध्य रेल्वे विभागाच्या नियंत्रणात जुने आरओबीच्या बाजूला नवीन आरओबी बांधकामासहीत मंजुरी कार्यारंभ आदेश मिळाले आहे. गोपालनगर रेल्वे क्रॉसिंगवर ओव्हर ब्रिज मंजूर झाले असून, एमएसआरडीसीच्या माध्यमातून पूर्णत्वास येणार असल्याचे खा. आनंदराव अडसूळ म्हणाले. पत्रपरिषदेला ज्ञानेश्वर धाने पाटील, प्रशांत वानखडे, सुनील खराटे, अर्चना धामणे, राजेश वानखडे, सुनील भालेराव, प्रकाश मंजलवार आदी उपस्थित होते.मध्य रेल्वे विभागाची आज बैठकमध्य रेल्वे भुसावळ व नागपूर विभागाची बैठक सोमवार, १३ आॅगस्ट रोजी होणार आहे. यात रेल्वे विकास, प्रवासी सेवेच्या मुद्द्यांवर चर्चा होईल, असे खा. अडसूळ म्हणाले. यात शकुंतला रेल्वे लाईनचे ब्रॉडगेज करणे, नागपूर-मुंबई दुरंतो व अन्य गाड्यांना बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबा, हावडा - शिर्डी गाडीला थांबा, अमरावती-कटरा गाडी सुरू करणे, मॉडेल रेल्वे स्थानकावरून सुटणारी लोकल गाडी अमरावती-शेगाव-जलंब-खामगांवपर्यंत सुरू करावी, राजकमल चौक रेल्वे ओव्हर ब्रिजला स्टील फॅ ब्रिक लावण्यासंदर्भात आणि मुंबई एक्सप्रेसचे डबे बदलविणे, मॉडेल रेल्वे स्थानकावरील रिकाम्या जागेवर व्यापारी संकुल उभारणे आदी विषयांवर मंथन होईल, असे खा. अडसूळ म्हणाले.
बडनेरा, अकोली, ‘मॉडेल’ रेल्वे स्थानकावर ओव्हर ब्रिज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 10:48 PM
बडनेरा, अकोली आणि अमरावतीच्या मॉडेल रेल्वे स्थानकावर ओव्हर ब्रिज साकारले जाणार आहे. तसेच प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी ५१ कोटींच्या विविध विकासकामांचे कार्यारंभ आदेश रेल्वे मंत्र्यालयातून निघाल्याची माहिती खा. आनंदराव अडसूळ यांनी रविवारी पत्रपरिषदेतून दिली.
ठळक मुद्देआनंदराव अडसूळ यांची माहिती : ५१ कोटींच्या विविध कामांचे कार्यारंभ आदेश