लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : युतीमध्ये बडनेरा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. या मतदारसंघात प्रीती संजय बंड यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा मुंबईत झाली. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षाच्या अधिकृत उमेदवारीचा एबी फॉर्म देण्यात आल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.बडनेरा मतदारसंघात भाजप-सेनेकडून उमेदवारी मिळण्याकरिता इच्छुकांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू होती. भाजपद्वाराही मतदारसंघासाठी जोरकस दावा करण्यात आला. मात्र यात प्रीती बंड सरस ठरल्या. वलगाव मतदारसंघाचे तीनवेळा आमदार राहिलेले संजय बंड यांच्या त्या पत्नी आहेत. वलगाव मतदारसंघ हा रद्दबातल झाला असला तरी या मतदारसंघाचा अर्धाअधिक भाग बडनेरा मतदारसंघात आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय बंड यांच्या अल्पशा मतांनी पराभव झाला होता. बंड यांच्या आकस्मिक निधनानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांद्वारे प्रीती बंड यांच्या उमेदवारीची मागणी सेनानेतृत्वाकडे केली होती.
Vidhan Sabha Election 2019; बडनेरा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 1:30 PM